Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचे पहिले सार्वभौम हरित बॉन्डस्! हरित प्रकल्पांमध्ये जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणुकीची संधी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Sovereign Green Bonds

मुक्तपीठ टीम

भारतासाठीच्या पहिल्या सार्वभौम हरित बॉन्डच्या आराखड्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशातील पात्र अशा हरित प्रकल्पांमध्ये जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करणे आता शक्य होणार आहे. हे बॉन्डस् जारी झाल्यानंतर, सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रकल्पांना अर्थव्यवस्थेचा विकास करतांना कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करणे शक्य होईल.

हरित बॉन्ड्सचं वेगळंपण काय?

  • ग्रीन बॉन्ड्स ही अशी आर्थिक साधने आहेत ज्यातून पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि हवामानासाठी अनुकूल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
  • पर्यावरणीय शाश्वततेकडे त्यांच्या संकेतामुळे, ग्रीन बॉण्ड्समध्ये नियमित बाँड्सच्या तुलनेत भांडवलाचा खर्च तुलनेने कमी असतो.
  • बॉण्ड वाढवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित विश्वासार्हता आणि वचनबद्धता आवश्यक असते.

हरित बॉन्ड्समुळे काय घडणार?

  • हा आराखडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर, 2021 मध्ये ग्लासगो इथे झालेल्या कॉप-26 या परिषदेत सांगितलेल्या भारताच्या “पंचामृत” या कटिबद्धतेशी अनुकूल आहे.
  • त्याशिवाय, केंद्रीय अर्थ आणि कार्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 साठीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पांत, हरित प्रकल्पांसाठी संसाधने एकत्रित करण्यासाठी असे सार्वभौम बॉन्डस् जारी करण्याबाबत जी घोषणा केली होती, त्या घोषणेची पूर्तता या मंजुरीमुळे झाली आहे.
  • हरित प्रकल्पांविषयीची देशाची राष्ट्रीय कटिबद्धता अधिक दृढ होणार आहे.
  • भारताने ही उद्दिष्टे पॅरिस कराराअंतर्गत स्वीकारली आहेत.

वरील संदर्भात, भारताचा पहिला सार्वभौम ग्रीन बॉन्डस् आराखडा, तयार करण्यात आला असून, या आरखड्यातील तरतुदींनुसार, हरित वित्तीय कार्यकारी समिती (GFWC) स्थापन करण्यात आली होती,जेणेकरुन, सार्वभौम ग्रीन बॉन्डस् जारी करण्याचा निर्णय प्रत्यक्ष अमलात आणला जाऊ शकेल.

त्याशिवाय, सीआयसीईआरओ ही एक स्वायत्त आणि जागतिक दृष्ट्या नावाजलेली नॉर्वेतील सेकंड पार्टी (तटस्थ) संस्था आहे, या संस्थेची नियुक्ती, भारताच्या ग्रीन बॉन्डस् आराखड्याचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आली. आयसीएमएच्या ग्रीन बॉन्डस् तत्वानुसार तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरल्या जाणाऱ्या उत्तम पद्धतीनुसार हे ग्रीन बॉन्डस् आहेत, हे या संस्थेला प्रमाणित करायचे आहे. सर्व अभ्यास आणि इतर मुद्यांचा विचार करुन सीआयसीईआरओने भारताच्या ग्रीन बॉन्डचा आराखडा ‘मिडियम ग्रीन’ आणि ‘गुड’ म्हणजे चांगले असा शेरा दिला आहे.

हा अहवाल खालील लिंक वरुन डाउनलोड करता येईल:

https://dea.gov.in/sites/default/files/Framework%20for%20Sovereign%20Green%20Bonds.pdf


Tags: central Governmentgood newsGreen ProjectsIndiamuktpeethSovereign Green Bondsकेंद्र सरकारघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतमुक्तपीठसार्वभौम हरित बॉन्डस्हरित प्रकल्प
Previous Post

‘हर हर महादेव’ प्रेक्षक मारहाण प्रकरण: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

Next Post

बावधनच्या राम नदी प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न, पर्यावरणवादी कार्यकर्त्या डॉ. स्नेहल दोंदे यांच्याकडून पाहणी!

Next Post
Bavdhan Ram river

बावधनच्या राम नदी प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न, पर्यावरणवादी कार्यकर्त्या डॉ. स्नेहल दोंदे यांच्याकडून पाहणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!