Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जागेवर नाही – जयंत पाटील

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jayant patil Critisize Maharashtra Govt

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून जिरायत शेतीला तात्काळ ५० हजार व बागायत शेतीला एक लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी आणि एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, अशा संकटकाळात  महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जागेवर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यात वीजेची २० टक्के दरवाढ झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. पेट्रोल – डिझेलचे दर कमी करुन दिलासा दिल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र तो दिलासा विजेचे दर वाढवून हिरावून घेण्याचे काम सरकारने केले असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

मागच्या अर्थसंकल्पातील कामे आणि आताच्या कामांना स्थगिती दिली ती उठवावी अशी मागणी करतानाच सरकारे येत असतात… जात असतात.त्यामुळे जनतेच्या कामांना स्थगिती देणे योग्य नाही त्यामुळे तात्काळ ती कामे सुरु करावीत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. स्थगिती चालू कामांना देणं हे तात्पुरते असते नंतर ती कामे करावीच लागतात असेही जयंत पाटील म्हणाले.

सुरेश धस काय आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आम्ही चुकीचं काम कधी करत नाही. मराठवाड्यातील आष्टी – पाटोदा या भागात कृष्णेचे पाणी पोहोचविण्याची जी योजना होती त्यासाठी रितसर निविदा निघाल्या आहेत. मराठवाडयाला पाणी द्यायची योजना महाविकास आघाडी सरकारची होती. ही योजना नको असेल तर सरकारने निर्णय घ्यावा हे सरकार मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवत असेल तर… मात्र हे नवं सरकार तसं काम करणार नाही याची खात्री आहे मात्र तसं केलंच तर जनतेला काय चालले आहे हे नक्कीच कळेल असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यातील राजकीय घडामोडीवर तीन सदस्य खंडपीठ नेमलेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात योग्य निर्णय लागेल. शेवटी कायदा कशासाठी पक्षातंर्गत थांबवण्यासाठी आहे. पक्षातंर्गत झाल्यावर सुप्रीम कोर्टाने तात्काळ आदेश द्यायला हवा होता आता ते घडेल असे वाटते. पक्षातंर्गत कायदा, नियम पायदळी तुडवून कोण सत्तेत येत असेल तर कडक कारवाईही करण्यात यायला हवी असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

सरकारचा विस्तार करणं न करणं त्यांचा विषय आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रीमंडळ जाग्यावर नाही याबाबत जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.


Tags: jayant patilMaharashtraMaharashtra CabinetMaharashtra govtजंयत पाटीलमहाराष्ट्रमहाराष्ट्र मंत्रिमंडळ
Previous Post

कानाखाली मारण्याची धमकी देणाऱ्या बंडखोर आमदाराला प्रत्युत्तर! शिवसैनिक तरुणीला धमक्या!

Next Post

एकनाथ शिंदेंनी नेमलेली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी ते नवे नेते!! शिवसेनेची घटना सांगते हे शक्य नाही!!

Next Post
Shivsena

एकनाथ शिंदेंनी नेमलेली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी ते नवे नेते!! शिवसेनेची घटना सांगते हे शक्य नाही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!