Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंनी नेमलेली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी ते नवे नेते!! शिवसेनेची घटना सांगते हे शक्य नाही!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivsena

अपेक्षा सकपाळ

खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. दरम्यान शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून तर दिपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. यानिर्णयानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. सध्या लोकशाहीची थट्टा सुरु आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे. एकीकडे दोन गटातील दावे-प्रतिदावे सुरु असतानाच शिवसेनेची घटना काय सांगते, ते तपासण्याची किंवा तिचे दाखले देण्याचे काम कोणतेही माध्यम करताना दिसत नाही. त्यामुळे कायदे अभ्यासक प्रवीण बिरादार यांच्याशी संवाद साधून मुक्तपीठने महत्वाची माहिती मिळवली आहे.

चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते, आदित्य ठाकरे

  • सर्कसमध्ये काहीही होऊ शकते.
  • राज्यात जे सुरु आहे ते घटनाबाह्य आहे.
  • ही लोकशाहीची थट्टा सुरु आहे.
  • मी याकडे जास्त लक्ष देत नाहीये.
  • आमच्याकडून राजकारण कमी झालं, हा आमचा दोष असू शकतो.
  • चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते.
  • त्यामुळे हादेखील आमचा दोष असू शकतो.
  • आम्ही लोकांची २४ तास सेवा करत आहोत.
  • आमचं हे काम अजूही सुरु आहे.

शिंदे गटानं राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली!

  • शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के दिले जात आहेत.
  • एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे.
  • या कार्यकारिणीमध्ये शिवेसेनेतील बंडखोर आमदार आणि नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
  • या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • तर दिपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • तानाजी सावंत, विजय नहाटा, यशवंद जाधव, गुलाबराव पाटील यांची शिवसेना उपनेते म्हणून तर आज शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
  • पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेची घटना काय सांगते?

  • शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख पद हे सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली आहे.
  • त्या पदावर २०१७च्या निवडणूक आयोगाकडे सादर निवडणूक ठरावानुसार उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  • शिवसेना पक्षप्रमुख हे राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा यांच्यासह कामकाज करतात.
  • शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेना नेते, पदाधिकारी नेमू शकतात तसेच काढूही शकतात.
  • शिवसेना पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसुळ आणि रामदास कदम यांची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी केलेली आहे.
  • तसेत घटनेप्रमाणे पक्षनेत्यांना शिवसेनेसंदर्भात कोणतेही संघटनात्मक नियुक्ती करण्याचे, हकालपट्टीचे अधिकार नाहीत.
  • त्यामुळे शिवसेना कार्यकारिणी बरखास्त किंवा नवी नेमणे हे एकनाथ शिंदेंना करण्याचा अधिकारच नाही.
  • त्यांनी शिवसेनेच्या पदांवर कोणालाही नेमले तरी ते शिवसेनेच्या घटनेनुसार नाही.

Tags: aditya thackerayEknath ShindeShivsenaUddhav Thackerayआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाशिवसेना नवी राष्ट्रीय कार्यकारिणी
Previous Post

महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जागेवर नाही – जयंत पाटील

Next Post

बुलडोझरची कमाल! सपा आमदारानं पक्ष निर्णय डावलत भाजपाच्या द्रोपदी मुर्मूंना मत दिलं!

Next Post
Yogi AdityaNath ANd Shahjeel Islam

बुलडोझरची कमाल! सपा आमदारानं पक्ष निर्णय डावलत भाजपाच्या द्रोपदी मुर्मूंना मत दिलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!