Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कानाखाली मारण्याची धमकी देणाऱ्या बंडखोर आमदाराला प्रत्युत्तर! शिवसैनिक तरुणीला धमक्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ayodhya Paul Patil And Santosh Bangar

मुक्तपीठ टीम

हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्यावर टिकेची झोड उडत आहे. विशेषत: सोशल मिडियावर ‘गद्दार’ अशा कमेंट्स केल्या जात आहे. त्यानंतर बांगर यांनी कोणी गद्दार असा उल्लेख केला तर त्यांच्या कानशिलात लावा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर ते चांगलेच ट्रोल झाले आहेत. शिवसेनेच्या समाजमाध्यम समन्वयक अयोध्या पोळ-पाटील यांनी संतोष बांगर यांना आव्हान केले आहे. त्यांनाही धमक्या आल्याचं त्यांनी सांगतानाच, आपण धमक्यांना जुमानणार नसल्याचंही त्या म्हणाल्या.

काय म्हणाले होते संतोष बांगर?

  • सुरुवातीच्या काळात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना संतोष बांगर यांनी गद्दारच नव्हे तर शिव्या-शापही दिले होते.
  • मात्र यानंतर स्वत:च शिंदे गटात सामील झाले.
  • संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून त्यांच्यावर टिकेची झोड उडत आहे.
  • सोशल मिडियावर ‘गद्दार’ अशा कमेंट्स त्यांना येत आहे.
  • यावरून त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात, आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही”, असं विधान केलं.

धमक्या फक्त बांगरांकडूनच नाही तर स्थानिक आमदारांकडूनही!!

  • संतोष बांगर यांच्या विधानानंतर शिवसेनेच्या समाजमाध्यम समन्वयक अयोध्या पोळ-पाटील यांनी संतोष बांगर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
  • ते म्हणत आहेत की आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणायचं नाही. जर असं कुणी म्हणत असेल, तर आमचे शिवसैनिक त्यांच्या कानाखाली आवाज काढतील.
  • पण मला धमक्या फक्त बांगरांकडूनच नाही तर स्थानिक आमदारांकडूनही आल्या आहेत.
  • मी जेव्हा बालाजी कल्याणकरांचं नाव घेऊन पोस्ट लिहिल्या, तेव्हा मला भायखळ्यातून फोन आले.
  • तुम्ही आमच्या मॅडमबद्दल लिहायचं नाही असं सांगितलं गेलं. मी तर तोपर्यंत सुरुवातही केली नव्हती.
  • पण मला करू नको म्हटलं तर मी ते सगळ्यात आधी करते.

जीव गेला तरी बेहत्तर, पण…

  • आपण धमक्यांना बळी पडणारे नसल्याचं अयोध्या पोळ-पाटील यांनी यावेळी सांगितलं.
  • करून करून काय करतील? हातपाय तोडतील किंवा जीव घेतील.
  • माझे आई-वडील अभिमानाने म्हणतील की मुलीनं शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला.
  • माझ्यासारखी लकी कुणीच नसेल.
  • कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अशा गोष्टींना बळी न पडलेल्यांची नावं घेतील, तेव्हा माझं नाव घेतील.
  • मी अशा धमक्यांना घाबरणारी नाही.
  • मला भायखळ्यातून धमक्या आल्या, तेव्हा मी सेनाभवनला गेले होते.
  • तेव्हा मी आदित्य ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातली.
  • माझी उद्धव ठाकरेंसोबतही बैठक झाली, तेव्हाही मी त्यांना ही बाब सांगितली.
  • जीव गेला तरी बेहत्तर, पण मी पक्षाची बाजू मांडायचं सोडणार नाही.

Tags: Aaditya ThackerayAyodhya Paul PatilMaharashtraMaharashtra Political Crisissantosh bangarShivsenaYuva Senaअयोध्या पोळ-पाटीलसंतोष बांगर
Previous Post

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील कोवळ्यांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं! ‘जिजाऊ’च्या डंपिंग ग्राऊंड शाळेचं एकच ध्येय!!

Next Post

महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जागेवर नाही – जयंत पाटील

Next Post
Jayant patil Critisize Maharashtra Govt

महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जागेवर नाही - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!