Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुलेट ट्रेनसमोर नवा अडथळा, इंजिनीअर्सच्या मानधन आयकराविरोधात जपान आक्रमक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai-Ahmedabad Bullet Train

मुक्तपीठ टीम

मुंबई ते अहमदाबाद अंतर कमी करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात नवा अडथळा निर्माण झाला आहे. आतापर्यंत अनेक अडथळे येत राहिले आहेत. या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतानाही आजवर गुजरातमधील कामच प्रकल्पपथावर आहे. तर महाराष्ट्रातील काम अद्याप झालेलं नाही. त्यातच आता ज्या जपानचं तंत्रज्ञान आणि कर्जाच्या आधारे हा प्रकल्प करण्यात येत आहे, त्या जपाननेच त्यांच्या अभियंत्यांच्या उत्पन्नावर भारतात लावण्यात आलेल्या आयकराला विरोध केला आहे. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास प्रकल्पाला विलंब करण्याचा इशाराही जपानने दिल्याच्या बातम्या राष्ट्रीय दैनिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.

 

जपानचा आयकर वसुलीला विरोध का?

  • बुलेट ट्रेनसाठी जपानने कर्ज दिले आहे.
  • हे बिनव्याजी कर्ज देताना जपानने त्यांचेच तंत्रज्ञान आणि बुलेट ट्रेनही पुरवली आहे.
  • या प्रकल्पावर जपानचे इंजिनीअर्स सल्लागाराचे काम करत आहेत.
  • जपानच्या या सल्लागारांच्या उत्पन्नावर आयकर आकारला जाऊ नये, अशी जपानची मागणी आहे.
  • जपान सरकारने अनुदानही दिलेल्या प्रकल्पात जपानी इंजिनीअर्सकडून आयकर घेऊ नये अशी जपानची भूमिका आहे. २०२२मध्ये मंजूर झालेल्या वित्त विधेयकात आयकराची सूट मागे घेण्यात आली आहे.
  • आता लागू नवीन नियमांनुसार, जपानी सल्लागारांना चालू आर्थिक वर्षापासून आयकर देखील भरावा लागेल.
  • जपान इंटरनॅशनल कन्सल्टेशन्स आणि जेई या दोन जपानी कंपन्यांना बुलेट ट्रेन प्रकल्पाची आखणी करण्याचे काम देण्यात आले आहे.
  • या कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कर सवलत देण्याची मागणी जपान सरकारने केली आहे.

 

मोदी सरकार काय करणार?

  • बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट मानला जातो.
  • जर आयकर सूट रद्द केल्यामुळे त्यांच्याच स्वप्नात अडथळे येत असतील, तर आता मोदी सरकारचे अर्थमंत्रालय काय करते, तेथे लक्ष लागले आहे.
  • जर मोदी सरकारने सूट दिली तर एकप्रकारे जपानच्या दबावापुढे भारत झुकला असे मानले जाईल.
  • जर जपानेचे ऐकले नाही तर मोदींच्या स्वप्नपूर्तीत अडथळे येतील.

Tags: Engineers HonorariumIndian Income Taxmodi governmentmuktpeethMumbai-Ahmedabad Bullet Trainprime minister narendra modiइंजिनीअर्स मानधनपंतप्रधान नरेंद्र मोदीभारतीय आयकरमुक्तपीठमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमोदी सरकार
Previous Post

मोदींचे मंत्रीच मशिदीवरील भोंग्यांच्या रक्षणासाठी मनसेविरोधात उभे ठाकणार!

Next Post

“पोलिसांच्या संरक्षणात शिवसेनेची गुंडगिरी” – नारायण राणे

Next Post
Narayan Rane

"पोलिसांच्या संरक्षणात शिवसेनेची गुंडगिरी" - नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!