Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदींचे मंत्रीच मशिदीवरील भोंग्यांच्या रक्षणासाठी मनसेविरोधात उभे ठाकणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray on loudspeaker

मुक्तपीठ टीम

मशिदींवरील भोंग्यांविरोधातील मनसेच्या हनुमान चालिसा आंदोलनाला भाजपाही ठामपणे उभी असली, तरी मोदी सरकारमधील सर्वच मंत्री भाजपाशी सहमत आहेत असे दिसत नाही. सामाजिक न्याय कात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेतली आहे. तेवढंच नाही तर मशिदींवरील भोंग्यांच्या रक्षणासाठी मनसेविरोधात आरपीआयचे कार्यकर्ते सज्ज असणार आहेत.   “मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा राज ठाकरेंचा नारा हा संविधानाची पायमल्ली करणार असून, रिपब्लिकन पक्षाचा या भूमिकेला कडाडून विरोध करतो. ३ मे रोजी भोंगे उतरविण्याला जाहीर विरोध करत त्या दिवशी सर्व मशिदींच्या भोंग्यांच्या संरक्षणार्थ रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी उभे राहावे, सूचना दिल्या आहेत,” असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘रिपाइं’ची राज्यस्तरीय बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर, ‘रिपाइं’चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, नेते राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, शशिकला वाघमारे, संगीता आठवले, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सरचिटणीस बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “भोंग्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. भगवा हे शांततेचे प्रतीक आहे. जर राज ठाकरेंनी अंगावर भगवा चढवला असेल, तर त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा. त्यांनी कोणाच्या भावना दुखावू नयेत. मंदिरावर भोंगे लावण्यास आमचा विरोध नाही. मात्र मशिदींवरील भोंगे उतरविण्यास आमचा विरोध आहे. त्याचप्रमाणे मौलानांनीही चुकीचे वक्तव्य करू नये. धमकीवजा भाषेचा वापर होणे योग्य नाही. त्यांनी मुस्लिमांना भडकवू नये व मुस्लिम समाजानेही त्यांचे ऐकू नये, असे माझे आवाहन आहे. कुराण शांततेचा मार्ग सांगतो. आपण हिंसेची भाषा करणे साफ चूक आहे.”

“राज ठाकरेंचा पहिला झेंडा सर्व रंग समावेशक होता. पण आता तो भगवा झाला आहे. जर भगवाच चढवायचा होता, तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. शिवसेना सोडून त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आम्हाला दादागिरी करता येत नाही असे नाही; पण आम्हाला दादागिरी करायची नाही, शांतता हवी आहे. म्हणूनच आम्ही भोंग्यांच्या संरक्षणार्थ उभे राहू. मुस्लिमांनी जर कधी आपल्या सणांना विरोध केला नाही, तर त्यांच्या अजानला विरोध करण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

आगामी निवडणूक भाजप सोबतच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईची सत्ता उलटवण्याचे ठरवले असून, यावेळीही आम्ही ११५ पेक्षा अधिक जागा मिळवू, असे ते म्हणाले. “मी भाजप सोबत असे पर्यंत मनसे भाजपमध्ये येणे अशक्य आहे. जर असे झाले तर भाजपचा जो नवा मतदार आहे तो नाराज होईल,” असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “राज्यात कायदे व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. जर समजत वाद निर्माण होत असतील तर सरकारने लेचीपेची भूमिका घेऊ नये. हे सरकार दुबळे आहे. राष्ट्रपती राजवटीची गरज आहे हे आमचे मत आहे.”

तत्पूर्वी, अल्पबचत भवन येथे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आठवले यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. कोरोनामुळे दोन वर्षांच्या काळात नव्याने सदस्य नोंदणी झाली नव्हती. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागत मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून पक्षबांधणीवर भर द्यावा. आगामी पालिका निवडणुकांत अधिकाधिक जागा मिळवण्याच्या दृष्टीने सर्वांनी तयारीला लागावे, आशा सूचना आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी आठवले यांचा पुणे शहर ‘रिपाइं’च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.


Tags: BJPLoudspeakersmnsModi MinisterRamdas Athawaleभाजपामनसेमशिदींवरील भोंगेरामदास आठवले
Previous Post

‘पॉर्न’अलर्ट: पॉर्न पाहता? नक्कीच वाचा ‘हे’ही!

Next Post

बुलेट ट्रेनसमोर नवा अडथळा, इंजिनीअर्सच्या मानधन आयकराविरोधात जपान आक्रमक!

Next Post
Mumbai-Ahmedabad Bullet Train

बुलेट ट्रेनसमोर नवा अडथळा, इंजिनीअर्सच्या मानधन आयकराविरोधात जपान आक्रमक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!