Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्लास्टिक अलर्ट: बाटली घातक तर नाही? तपासा बाटलीच्या तळाचा ‘हा’ नंबर…

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
WaterBottel

मुक्तपीठ टीम

प्लास्टिक वापरावर बंदी असूनही आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर हा सहज होतो. मग ते सुपर मार्केटमध्ये कोणतीही वस्तू विकत घेणे असो किंवा पाण्याची बाटली असो, जिथे बघाव तिथं प्लासिटकचा वापर होतो. ज्या प्लास्टिकच्या बाटलीतून आपण पाणी पीतो ती बॉटलसुद्धा विषारी आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्यापूर्वी बाटलीच्या तळाचा ‘हा’ नंबर नक्की तपासा.

प्रत्येक प्लास्टिकच्या बाटलीच्या तळाशी एक वेगळा नंबर लिहिलेला असतो आणि एक वेगळा मार्कर असतो, जो ही बाटली वापरण्यासाठी सुरक्षित आहे की, नाही हे सांगतो. प्लास्टिक किंवा PET बाटलीच्या तळाशी असलेले नंबर आणि मार्करबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

या बाटलीमधून पाणी पिणे सुरक्षित…

  • पाणी पिण्यासाठी बाटली विकत घ्यायला जाल तेव्हा तिच्या खाली लिहिलेला नंबर आणि मार्कर नक्की तपासा.
  • बाटलीच्या तळाशी २, ४ किंवा ५ लिहिलेले दिसले तर ती बाटली खरेदी करा.
  • ही बाटली पाणी साठवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
  • कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीखाली एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलिथिलीन), एलडीपीई (लो डेन्सिटी पॉलीथिलीन) आणि पीपी (पॉलीप्रॉपिलीन) लिहिलेले दिसले तर ती विकत घ्या.
  • या प्रकारची बाटली पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

या बॉटलीमधून पाणी पिताना ही काळजी घ्या…

  • बाटलीच्या तळाशी १ किंवा ७ क्रमांक लिहिलेला दिसला तर ती बाटली वापरू शकता.
  • पण, या बाटलीचा वापर अतिशय विचारपूर्वक करा.
  • अशी बाटली पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाहीत.
  • अशा प्रकारच्या प्लास्टिकचा वापर शीतपेयाची बाटली, अन्न साठवण जार, कापडी तंतू आणि माउथवॉशची बाटलीसाठी केला जातो.
  • एवढेच नाही तर बाटलीच्या तळाशी एचडीपीई (हाय डेन्सिटी पॉलिथिलीन), एलडीपीई (लो डेन्सिटी पॉलीथिलीन) आणि पीपी (पॉलीप्रॉपिलीन) लिहिलेले असले तरी त्यांचा वापर टाळा.

चुकूनही ही बाटली वापरू नका

  • प्लास्टिकच्या बाटलीच्या तळाशी ३ किंवा ६ नंबर लिहिलेला दिसेल तेव्हा चुकूनही ती विकत घेऊ नका.
  • ही बाटली सर्वात हानिकारक आहे.
  • या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर प्रामुख्याने पाईप्स, क्लिनर बाटल्या, स्वयंपाकाच्या तेलाची बाटली आणि शॉवरचे पडदे बनवण्यासाठी केला जातो.
  • प्लास्टिकच्या बाटलीच्या तळाशी पीव्हीसी (Polyvinyl Chloride) आणि पीएस (Polystyrene) लिहिलेले दिसले तर ती बाटली विकत घेऊ नका.
  • याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

प्लास्टिक ऐवजी याचा वापर करा…

  • प्लास्टिकच्या बाटलीऐवजी स्टील किंवा तांब्याची बाटली वापरा.
  • अशी बाटली आरोग्यालाही हानी पोहोचवत नाहीत.
  • तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

Tags: HDPELDPEPET NumberPlastic Alertप्लास्टिक अलर्ट:
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

लोकप्रिय उपयोगी VLC मीडिया प्लेयरवरील बंदी उठली! आता पुन्हा डाऊनलोड शक्य …

Next Post
VLC MEdia Player

लोकप्रिय उपयोगी VLC मीडिया प्लेयरवरील बंदी उठली! आता पुन्हा डाऊनलोड शक्य ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!