Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

मुक्तपीठ टीम

अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांकरीता शासकीय वसतीगृहासाठी अर्ज केला आहे परंतु त्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११वी, १२वी तसेच इयत्ता १२वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता २५हजार, निवास भत्ता १२ हजार, तसेच निर्वाह भत्ता ६ हजार असे एकूण प्रति विद्यार्थी रक्कम ४३ हजार तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीकेच्या हद्यीतील व हद्यीपासुन ०५ कि.मी. परिसरातील महाविद्यालयात शिकत असलेले विदयार्थी या योजनेस पात्र आहेत. (या व्यतिरीकत्त तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र नाहीत) विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा. (जात प्रमाणपत्र आवश्यक)
या योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेश घेण्यास पात्र असावा. दिव्यांग ‍विद्यार्थ्यास (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) 3% आरक्षण ‍विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. अपुर्ण भरलेल्या व अपुर्ण कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, अधिक्षीका मुलींचे शासकीय वसतीगृह, विश्रामबाग, सांगली ०२३३-२३०४३६७ अधिक्षक मुलांचे शासकीय वसतीगृह, विश्रामबाग, सांगली ०२३३-२३०१४१४ ‍किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली जुना बुधगांव रोड, सामाजिक न्याय भवन, सांगली ०२३३-२३७४७३९ येथे संपर्क साधावा.


Tags: Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojanaभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरसांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
Previous Post

भारतातही “अनेक गॅजेट्स, एक देश, एक चार्जर!”, लॅपटॉप कंपन्या सहमत!

Next Post

प्लास्टिक अलर्ट: बाटली घातक तर नाही? तपासा बाटलीच्या तळाचा ‘हा’ नंबर…

Next Post
WaterBottel

प्लास्टिक अलर्ट: बाटली घातक तर नाही? तपासा बाटलीच्या तळाचा 'हा' नंबर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!