Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिकांना हवीय खालची सीट? आयआरसीटीसी सांगितल्या तशा ‘या’ स्टेप्स घ्या…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
IRCTC

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वे म्हणजेच आयआरसीटीसी प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा पुरवते. ज्यामध्ये तिकिटपासून ते लोअर बर्थपर्यंत प्राधान्य मिळते. मात्र, अनेकांना याची माहिती नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ कसा बुक करायचा आणि ते कन्फर्म कसं करायचं हे अनेकांना माहिती नसते. अनेक वेळा तिकीट बुकिंगवेळी असे घडते की ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ देण्याची विनंती करूनही त्यांना मधला किंवा वरचा बर्थ मिळतो. त्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी आयआरसीटीसीने महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे.

एका प्रवाशाने काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेला ट्विट केले आणि आरोप केला की, त्याने त्याच्या काकांसाठी लोअर बर्थ बुक केला होता, पण त्याला वरचा बर्थ देण्यात आला होता. त्याच्या काकांना पाय नसल्यामुळे त्यांना वरच्या किंवा मधल्या बर्थमधून प्रवास करणे कठीण जाते. प्रवाशाने त्याच्या ट्विटमध्ये त्याचा पीएनआर नंबर देखील समाविष्ट केला आहे. त्यानंतर आयआरसीटीसीनेही याच ट्विटवर उत्तर दिले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट बुक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीला, आयआरसीटीसीने दिली माहिती…

  • आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवर तक्रार करणाऱ्या प्रवाशाला उत्तर दिले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ तिकीट कसे बुक करायचे ते स्पष्ट केले.
  • “सर, पीएनआर क्र. २४४८४०७९२९ सर्वसाधारण कोट्यात बुक केले आहे.
  • तुम्ही सर्वसाधारण कोट्यात खालच्या बर्थला प्राधान्य देऊ शकता, पण बर्थचे वाटप उपलब्धतेवर अवलंबून असते.
  • त्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा “लोअर बर्थ अलॉट असेल तरच बुक करा”चा पर्याय निवडावा लागेल.
  • आयआरसीटीसीने पुढे लिहिले, कृपया लक्षात घ्या की सर्वसाधारण कोट्यातील खालच्या बर्थचे वाटप पूर्णपणे उपलब्धतेच्या अधीन आहे आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
  • तसेच, तुम्ही ऑन ड्युटी टीटीईंशी (TTE) संपर्क साधू शकता, ज्यांना गरजूंना खालचा बर्थ देण्यासाठी अधिकृत केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी कसे बुक कराल तिकीट?

  • आयआरसीटीसीच्या अधिकृत पेजवर लॉगिन करा.
  • लॉगिन करून, तुम्हाला हव्या असलेल्या गाडीचे तिकीट बुक करताना, बर्थ प्रेफरेंस असा पर्याय दिसेल या ठिकाणी लोअर बर्थ हा पर्याय निवडा.
  • तसेच कोटा ज्येष्ठ नागरिक सिलेक्ट करायला विसरू नका.

आयआरसीटीसीचे नियम काय आहेत?

  • नियमांनुसार, सर्व गाड्यांमधील स्लीपर क्लासमध्ये प्रत्येक कोचमध्ये सहा लोअर बर्थ आणि एसी ३ टियर आणि एसी -२ टियर क्लासमधील प्रत्येक डब्यात ३ लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
  • त्याचवेळी, ट्रेन सुटल्यानंतर खालचा कोणताही बर्थ रिकामा असल्यास वरचा किंवा मधला बर्थ मिळालेल्या कोणत्याही दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा गर्भवती महिलेच्या विनंतीनुसार तसे केले जाईल.
  • चार्टमध्ये आवश्यक बदल करून ऑन-बोर्ड तिकीट तपासणी करणार्‍या कर्मचार्‍यांच्या खाली जागा दिली जाऊ शकते.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Good news Morningirctcnews2usesenior citizensआयआरसीटीसीउपयोगी बातमीगुड न्यूज मॉर्निंगज्येष्ठ नागरिक
Previous Post

निर्यातदारांसाठी मुंबईच्या परळमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आणि प्रदर्शन

Next Post

इंडियन ऑइलमध्ये ट्रेड आणि टेक्निशियन पदांवर १ हजार ५३५ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
Indian Oil

इंडियन ऑइलमध्ये ट्रेड आणि टेक्निशियन पदांवर १ हजार ५३५ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!