Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निर्यातदारांसाठी मुंबईच्या परळमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आणि प्रदर्शन

September 28, 2022
in Uncategorized
0
One District one Product

मुक्तपीठ टीम

मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. येत्या २८ व २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील परळ भागातील भोईवाड्यातील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात कार्यशाळा – प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. त्यानुषंगाने गुंतवणुकवृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District one Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन असणार आहे.

कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियम, बँकेचा सहभाग, उद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहिती, निर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतूदी, तज्ज्ञ निर्यातदारांचे अनुभव कथन तसेच सदर चर्चासत्रांकरिता निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक सवलती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

या एक दिवसीय कार्यशाळा तसेच दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता दि. २८ व २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे, असे जिल्ह्यातील निर्यातदारांना आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता मर्यादित आसन व्यवस्था असल्याने आपल्या उपस्थितीबाबत उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर, मुंबई, या कार्यालयाच्या ई-मेल आयडी didicmumbai@gmail.com तसेच या कार्यालयाच्या 022-25206199/25208182 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी, असे उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, मुंबई यांनी कळविले आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Ease Of Doing BusinessexporterGood news MorningmumbaiOne District One Productएक जिल्हा एक उत्पादनगुड न्यूज मॉर्निंगनिर्यातदारमुंबईराष्ट्रीय मिल मजदूर संघव्यवसाय सुलभीकरण
Previous Post

झिरोधाचा कर्मचाऱ्यांना फिटनेस चॅलेंज… फिट असल्यास मिळणार पगार वाढ आणि १० लाखांचे बक्षीस!

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना हवीय खालची सीट? आयआरसीटीसी सांगितल्या तशा ‘या’ स्टेप्स घ्या…

Next Post
IRCTC

ज्येष्ठ नागरिकांना हवीय खालची सीट? आयआरसीटीसी सांगितल्या तशा 'या' स्टेप्स घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!