Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या भारतातील निर्यातीत सात वर्षांच्या कालावधीत ८८ टक्के वाढ

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Electronic goods

मुक्तपीठ टीम

जागतिक दर्जाच्या व उत्तम गुणवत्तेच्या वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी राबवल्या जात असलेल्या योजनांना आता फळ येत आहे. या प्रयत्नांमुळेच भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत २०१३-१४ नंतर ८८% वाढ झाली आहे. २०१३-१४ सालच्या ६६ हजार लाख अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीवरून २०२१-२२ साली  ही निर्यात १,२४,००० लाख अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढली आहे.

 

मोबाईल फोन्स, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर (लॅपटॉप्स, टॅब्लेट्स),  टीव्ही व इतर ग्राहकोपयोगी वस्तू, औद्योगिक वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, आणि वाहनउद्योगात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा या निर्यातीत मोठा सहभाग आहे.

 

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण २०१९ अंतर्गत  इलेक्ट्रॉनिक सिस्टीम संरचना आणि उत्पादन (ESDM) या क्षेत्रात भारताला  जागतिक केंद्र बनवणे  हे  उद्दिष्ट असून त्यासाठी लागणारे घटक  विकसित करणे आणि या उद्योगासाठी  पोषक वातावरण तयार  करणे हे काम सुरु आहे. यात मोठ्या उत्पादकांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLI), तसेच इलेक्ट्रॉनिक घटकांच्या व सेमीकंडक्टर्स उत्पादनासाठी प्रोत्साहन योजना (SPECS) , सुधारित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर योजना (EMC 2. 0) ही माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादनासाठी असलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना, या चार योजनांद्वारे इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला पाठबळ देणे आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्था तयार करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

 

या क्षेत्रातील निर्यात सतत वाढत आहे. जानेवारी २०२१ मधील २७५.४ लाख अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीपेक्षा जानेवारी २०२२ मधील निर्यात २३.६९% नी वाढून ३४०.६ लाख अमेरिकन डॉलर्स झाली आहे. जानेवारी २०२० मधील २५८.५ लाख अमेरिकन डॉलर्स किमतीच्या निर्यातीच्या तुलनेत जानेवारी २०२२ मधील निर्यात ३१.७५% नी वाढलेली दिसून येते.

 

२०२०-२१ मधील (एप्रिल ते जानेवारी) मधील २२८.९ अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत २०२१-२२ मधील (एप्रिल ते जानेवारी) निर्यात ३३५.४४ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत अर्थात ४६.५३% ने वाढली असून २०१९-२० (एप्रिल ते जानेवारी) तील २६४.१३ अब्ज अमेरिकन डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत ती २७% वाढली.

 

निर्यातीत वाढ होण्यासाठी सरकार अनेक सक्रिय पावले उचलत आहे. विशेषतः कोरोना काळामध्ये  निर्यातीतील अडचणी, मर्यादा, आणि अडथळे दूर करण्यासाठी सरकारने विशेष देखरेख विभागाची स्थापना केली आहे. निर्यातदारांना परवाने मिळवण्यासाठी मदत करणारा व तक्रार निवारण करणारा एक माहिती तंत्रज्ञान आधारित  मंच स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: central GovernmentElectronic goodsgood newsIncrease in domestic productionIndia exportsmuktpeethइलेक्ट्रॉनिक वस्तूकेंद्र सरकारचांगली बातमीदेशांतर्गत उत्पादन वाढभारत निर्यातमुक्तपीठ
Previous Post

काश्मिरच्या स्वर्गात श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग आणि दाल सरोवरापेक्षाही सुंदर काही ठिकाणं

Next Post

पुणे मेट्रो रेल्वेत ४० जागांवर नोकरीची संधी

Next Post
Pune Metro Railway

पुणे मेट्रो रेल्वेत ४० जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!