मुक्तपीठ टीम
लवकरच भारतीय रेल्वे डिझेल इंजिनवर चालणे बंद होणार आहे. देशातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याची ही योजना आहे. भारतीय रेल्वे देशातील रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करणार आहे. त्यावर मंत्रालयाने वेगाने काम सुरू केले आहे. आतापर्यंत, ८२ टक्के रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा पर्यावरणाला होईल. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेने १ हजार २२३ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ या कालावधीत, ८९५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीपेक्षा हे प्रमाण ३६.६४ टक्क्यांनी अधिक आहे.
भारतीय रेल्वेचे ब्रॉडगेज नेटवर्क विद्युतीकरण सुरू…
- भारतीय रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
- ही योजना केवळ इंधन ऊर्जा वापरणार नाही, ज्यामुळे उत्पादन वाढेल, इंधनावरील खर्च कमी होईल, ज्यामुळे परकीय चलनाचीही बचत होईल.
- भारतीय रेल्वेच्या इतिहासात २०२१-२२ दरम्यान ६ हजार ३६६ किलोमीटर मार्गाचे विक्रमी विद्युतीकरण करण्यात आले.
भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या ६५,१४१ किलोमीटर मार्गापैकी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ५३ हजार ४७० ब्रॉडगेज किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. हे एकूण ब्रॉडगेज नेटवर्कच्या ८२.०८ टक्के आहे. रेल्वे मंत्रालय गाड्यांच्या संचलनात आणि बांधकामात विविध बदल करत आहे, हे बदल पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी केले जात आहेत.