मुक्तपीठ टीम
भारतीय टपाल विभागाने गुजरात पोस्टल सर्कलसाठी मल्टी टास्किंग स्टाफ, पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. क्रीडा कोट्याअंतर्गत १८८ पदांची भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसाठी १२वी उत्तीर्ण पाहिजे.
- मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान ६० दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- पोस्टमन/मेल गार्डसाठी १२वी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान गरजेचे.
- मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान ६० दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- मल्टी टास्किंग स्टाफसाठी १०वी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये स्वीकारले जातील.
अधिक माहितीसाठी भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://dopsportsrecruitment.in/registration_pan.aspx
अधिकृत जाहिरात
https://dopsportsrecruitment.in/UploadNotifications/Gujarat/06.pdf








Subscribe