Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: चार आठवड्यांनंतर २९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात सुरू असलेला शिवसेनेचा सत्ता संघर्ष दररोज एक नवीन वळण घेताना दिसते. या सत्ता संघर्षात कोण बाजी मारणार यावर सर्वांचं लक्ष आहे. शिवसेना पक्षात पडलेल्या या फूटीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता पुढील सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. सुनावणीवेळी घटनापीठाने ठाकरे व शिंदे गटाला तोंडी युक्तिवाद न करता लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले. आता त्यी दिवशी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नेमकं काय घडेल, तिकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे शिवसेनेचे प्रकरण सुरु आहे.आज ही सुनावणी सुरु होताच घटनापीठाने लेखी मुद्दे, संदर्भ निकाल आणि अन्य साहित्याच्या सॉफ्ट कॉपी एकत्रित करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली. त्यामुळे आता २९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयाचे दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद आणि कागदपत्रे सादर करण्याचे आदेश!

  • शिवसेनेतील बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी केली आहे.
  • तर, एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीला आव्हान दिले आहे.
  • बंडखोर आमदारांचे निलंबन, शिंदे सरकारची वैधता आणि विधानसभा अध्यक्ष तसेच राज्यपालांचे अधिकार अशा विविध मुद्द्यांवर ठाकरे गट तसेच शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत.
  • आजच्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद केले जाण्याची शक्यता होती.
  • मात्र, सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने तोंडी युक्तिवाद ऐकण्यास नकार दिला.
  • आता लेखी युक्तिवाद आणि कागदपत्रे सादर करण्याचे दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
  • यानंतर ठाकर गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, लेखी युक्तिवाद दिल्यास त्याचे अवलोकन व अभ्यास करणे घटनापीठाला सोईचे जाईल.

पाच सदस्यीय घटनापीठात चंद्रचूड यांच्यासोबत न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा यांचा घटनापीठात समावेश आहे. आता ठाकरे आणि शिंदेंचे तसेच निवडणूक आयोगाचे वकील भेटतील. त्यांच्या चर्चेतून दोन्ही बाजूंचे मुद्दे ठरवले जातील. त्यानुसार संदर्भ निकाल, इतर साहित्य जोडले जाईल. त्यानंतर सॉफ्ट कॉपी स्वरुपात ते घटनापीठासमोर सादर केले जाईल. त्याचा अभ्यास करून घटनापीठ २९ नोव्हेंबरला त्या मुद्द्यांनुसार सुनावणी घेईल. सर्व पाया तयार असल्यामुळे सुनावणी जलद गतीने घेणे शक्य होईल. त्यामुळे संसदीय लोकशाहीचं भविष्य ठरवणारा निकाल लवकर देणे घटनापीठाला शक्य होणार आहे.


Tags: Constitution BenchMaharashtra power strugglemuktpeethShinde Groupshiv senaSupreme CourtThackeray GroupWritten Argumentsघटनापीठघडलं-बिघडलंठाकरे गटमहाराष्ट्र सत्ता संघर्षमुक्तपीठलेखी युक्तिवादशिंदे गटशिवसेनासर्वोच्च न्यायलय
Previous Post

भारतीय टपाल विभागात मल्टी टास्किंग स्टाफ आणि असिस्टंटसारख्या पदांवर १८८ जागांसाठी भरती

Next Post

राजद्रोह कायद्यावर जारी राहणार बंदी, जानेवारीत पुढील सुनावणी

Next Post
Supreme Court

राजद्रोह कायद्यावर जारी राहणार बंदी, जानेवारीत पुढील सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!