मुक्तपीठ टीम
भारतीय पोस्टात स्मॉल सेव्हिंग्ज योजनांमध्ये नऊ वेगवेगळ्या बचत योजना आहेत. स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भारतीय पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस बचत खाते योजना सर्वोत्तम आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याच्या लाभासोबतच सरकारी सुरक्षेचा लाभही मिळणार आहे. जाणून घेऊया या सरकारी योजनेबद्दल.
- या योजनेत, व्यक्ती किमान ५०० रुपयांच्या रकमेसह आपले खाते उघडू शकते.
- या योजनेत १८ वर्षांपुढील व्यक्ती आपले बचत खाते उघडू शकते.
- या स्कीममध्ये व्यक्ती एकच खाते उघडू शकते.
- या योजनेत पालकांकडून अल्पवयीन व्यक्तीचे खातेही उघडता येते.
- या योजनेत संयुक्त खाते उघडण्याची सुविधाही आहे.
- या योजनेत, खातेदाराला एकट्याने किंवा संयुक्तपणे खाते उघडल्यावर वार्षिक ०४ टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
- बचत बँक खात्यांवरील १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर करपात्र उत्पन्नातून सूट मिळेल.
- महिन्याच्या १० तारखेपासून महिन्याच्या अखेरीस ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास व्याज मिळणार नाही.
- याशिवाय तुम्ही खात्यातून फक्त ५० रुपये देखील काढू शकता.