Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारताच्या कृषी निर्यातीने ओलांडला ५० अब्ज डॉलर्सचा टप्पा!

April 14, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
agricultural

मुक्तपीठ टीम

मालवाहतुकीचे चढे दर, कंटेनरचा तुटवडा यांसारख्या कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉजिस्टिक आव्हानांना न जुमानता, भारताच्या कृषी निर्यातीने २०२१-२२ या वर्षात  ५० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला  आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने  (APEDA),   USD २५.६ अब्ज डॉलर्सच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात करून एक नवा इतिहास रचला आहे, जो भारताच्या एकूण USD ५० अब्ज कृषी निर्यातीच्या ५१ टक्के आहे. याशिवाय, अपेडाने  २५.६ अब्ज डॉलर्सची  शिपमेंटची  नोंदणी करून आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी २३.७ अब्ज डॉलर्सचे आपले निर्यात लक्ष्य देखील पार केलं  आहे.  आता ही निर्यात आणखी वाढवण्यासाठी केंद्राने चांगली निर्यात क्षमता असलेल्या ५० उत्पादनांची यादी तयार केली आहे.

वाणिज्य गुप्तवार्ता आणि सांख्यिकी महासंचालनालयाने (DGCI&S )  जाहीर केलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये कृषी निर्यात १९९२ टक्क्यांनी वाढून ५०.२१  अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. वाढीचा दर उल्लेखनीय असून  तो २०२०-२१ मध्ये गाठलेल्या ४१.८७ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत १७.६६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि मालवाहतुकीचे चढे दर, कंटेनरची कमतरता सारखी  अभूतपूर्व लॉजिस्टिक आव्हाने असतानाही साध्य केला  आहे. अपेडा  शेड्यूल उत्पादनांची निर्यात खाली आलेख -१ मध्ये दिली आहे .

Graph-1

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001LAOL.jpg

गेल्या दोन वर्षांतील ऐतिहासिक कामगिरी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यात  खूप उपयुक्त ठरेल.

एकूण कृषी निर्यातीच्या तुलनेत, अपेडाची  निर्यात २०२०-२१ मधील  २२.०३ अब्ज डॉलर्सवरून १६ टक्के वाढीसह  २०२१-२२ मध्ये २५.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. २०२१-२२ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अपेडा  उत्पादनांनी नोंदवलेला सर्वोच्च वाढीचा दर  (३० टक्क्यांहून अधिक) आलेख -२ वरून दिसून येईल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002V89M.jpg

२०२१-२२ च्या आकडेवारीनुसार अपेडा  ज्या देशांना प्रामुख्याने  निर्यात करते ते देश आहेत- बांग्लादेश, युएई , व्हिएतनाम, अमेरिका , नेपाळ, मलेशिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, इराण आणि इजिप्त.

कृषी-निर्यातीत लक्षणीय वाढ ही  कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य  उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यावर भर देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा  म्हणून पाहिले जाते.

विविध देशांमध्ये B2B प्रदर्शने आयोजित करणे, भारतीय दूतावासांच्या सक्रिय सहभागाने उत्पादन विशिष्ट आणि सामान्य विपणन मोहिमेद्वारे नवीन संभाव्य बाजारपेठांचा शोध घेणे यासारख्या अपेडाच्या  मार्फत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

कृषी उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने ३०० हून अधिक लोकसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले.

अपेडाचे  अध्यक्ष डॉ एम अंगमुथू म्हणाले, “आम्ही ५० कृषी उत्पादनांसाठी उत्पादने सारिणी  देखील तयार केली आहे ज्यात  आमच्या निर्यात पोर्टफोलिओच्या  विस्ताराला चांगला वाव आहे .

निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा  विविध आंतरराष्ट्रीय व्यापार विश्लेषणात्मक माहिती, बाजारपेठेतील संधीची  माहिती   संकलित करते आणि  निर्यातदारांमध्ये प्रसारित करते  आणि व्यापार संबंधी शंकांचे निरसन करते.

पीएम  गति शक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा एक भाग म्हणून, अपेडा  नाशवंत कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंत्रालयासह  विविध मंत्रालयांशी सहकार्य  करत आहे,

शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), सहकारी संस्था आणि महिला उद्योजकांना निर्यातदारांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अपेडाच्या संकेतस्थळावर  फार्मर कनेक्ट पोर्टल देखील स्थापन  करण्यात आले आहे. पोर्टलवर आतापर्यंत सुमारे ३,२९५ एफपीओ  आणि एफपीसी  आणि ३,३१५ निर्यातदारांची नोंदणी झाली आहे. अपेडा बरोबर २४  लाखांहून अधिक सेंद्रिय शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भारत हा जगात सेंद्रिय उत्पादनांचा आघाडीचा उत्पादक आहे.

तक्ता: कृषी आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादनांची  निर्यात तुलना

 

Products 2021-22

USD million

2020-21

USD million

Rice 9654 8829
Dairy Products 634 323
Pulses 358 265
Other Cereals 1083 705
Cashew 452 420
Wheat 2118 567
Fruits & Vegetables 1789 1617
Processed Products 1202 1120
Floriculture products 103 77
Sheep/goat meat 60 34
Buffalo meat 3303 3171
Poultry 71 58
Miscellaneous processed items 4753 4844
Total 25580 22030

स्रोत: DGCIS, मार्च २०२२ च्या ट्रेड अलर्टवर आधारित आणि बदलाच्या अधीन आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Agro ExportAPEDAGood news MorningIndiaकृषी निर्यातप्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणभारत
Previous Post

आता राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२६पर्यंत! केंद्रीय मंत्रिमंडळाची मुदतवाढीला मंजूरी

Next Post

विश्वविक्रमी Kia EV6 इलेक्ट्रिक कार भारतात होणार लाँच! ४२५ किमीची रेंज!!

Next Post
KIA EV6

विश्वविक्रमी Kia EV6 इलेक्ट्रिक कार भारतात होणार लाँच! ४२५ किमीची रेंज!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!