मुक्तपीठ टीम
देशातील टीयर २ आणि टीयर ३ म्हणजेच मध्यम आणि छोट्या शहरांमध्ये सेकंडहंड अलिशान कारच्या मागणीत वाढ दिसून येत आहे. ग्राहकांकडून तशी मागणी वाढत असल्याचा अनुभव अशा कारच्या व्यवहाराचे काम करणाऱ्या बॉईज अँड मशिन्स कंपनीला येत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत चौकशींमध्ये २०%ची वाढ दिसून आली आहे. त्यांच्या एकूण विक्रीपैकी साधारण ४०% विक्री ही टीयर २ आणि टीयर ३ शहरांमधून होत आहे. वापरलेल्या अलिशान गाड्यांसाठी चौकशी करणाऱ्या महिला ग्राहकांची संख्याही वाढत आहे.
बॉईज अँड मशिन्स कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ चतुर्वेदी म्हणाले, “गेल्या काही महिन्यांमध्ये छोट्या शहरांमधून आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर चौकशी होत आहे. टीयर २ आणि टीयर ३ शहरांमधील मागणी खूप वाढली आहे. त्याहीपुढे जाऊन, गेल्या वर्षीच्या तुलनेत, पूर्व-मालकी असलेल्या अलिशान गाड्यांसाठी महिला ग्राहकांची संख्याही वाढत आहे. आमच्या एकूण विक्रीमधील १०-१२% विक्री ही महिला खरेदीदारांसाठी होत आहे. महामारीला सुरुवात झाल्यापासून खाजगी दळणवळणाचे प्रमाण वाढले आहे. अधिक उत्पन्न गटात येणाऱ्या लोकांनी जीवनशैलीविषयक आणि उच्चभ्रू उत्पादनांवर पैसे खर्च करायला सुरुवात केली आहे.”
बॉईज अँड मशिन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश चतुर्वेदी पुढे म्हणाले, “अलिशान कारचा पर्याय निवडण्याकडे बहुसंख्य लोकांचा कल आहे आणि अलिशान गाडी घेण्यासाठी पूर्व-मालकी असलेल्या कार्सकडे वळणे हा सर्वाधिक सुयोग्य दृष्टीकोन आहे. पूर्व-मालकी असलेल्या अलिशान गाड्यांसाठीच्या बाजारपेठेचा विस्तार होण्यामधला हा महत्वाचा घटक आहे. गेल्या दोन तिमाहींमध्ये आमच्याकडे ७५% नवीन ग्राहक आले. त्यातील बहुसंख्य जण टीयर २ आणि टीयर ३ शहरांमधील होते.”
बॉईज अँड मशिन्स या स्पर्धेत नेहमीच आघाडीवर राहिलेले असून सर्व ग्राहकांना इंजिनावर ६ महिन्यांची वॉरंटी आणि वाहनाचे हस्तांतरण करून देण्याबाबत प्रामाणिक आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीकरता डिजिटलायझेशन हा महत्वाचा घटक असताना या क्षेत्राच्या वाढीसाठीही त्याची भूमिका महत्वाची आहे. वेबसाईटवर संपूर्ण यादी उपलब्ध असून देशाच्या कुठल्याही भागातून ती सहजपणे बघता येऊ शकते. त्यातून टीयर २ शहरांमधील लोकांना त्यांना परवडणारे सगळे पर्याय बघता येतात आणि त्यानुसार योग्य निर्णय घेता येतो. ग्राहकांचे संपूर्ण समाधान करत ग्राहकांच्या घरापाशी सुसज्ज कार पोहोचवली जाते.
सरकारची सकारात्मक धोरणे आणि जोडीला राज्ये आणि व्यवसाय खुले होत असताना पूर्व-मालकी अलिशान कारचा उद्योग २०२२-२३ मध्ये ठळकपणे वाढण्याचा अंदाज आहे.
About Boys and Machines
Founded in 2020, Boys and Machines already has a presence in Delhi NCR, Mumbai and Kolkata, covering North, East and Western regions of India. With demand for pre-owned sports cars only growing, the company is focused on growing its presence across India and beyond the traditional sports car markets of Mumbai and New Delhi. Its aim is to expand its network to eight cities by the end of 2022.