मुक्तपीठ टीम
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. घरातील फर्निचर आणि सजावटीचे सामान विकणारी कंपनी आयकियाने एक चांगली बातमी दिली आहे. आयकियाने लवकरच मुंबई शहरात भारतातील पहिले सिटी स्टोअर उघडण्याची घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी नवी मुंबईत मोठे स्टोअर उघडल्यानंतर, आयकिया आता मुंबईच्या वरळी भागातील कमला मिल्स येथे एक लहान सिटी स्टोअर उघडणार आहे. “महाराष्ट्र आणि भारतासाठी आयकियाच्या दीर्घकालीन बांधिलकीच्या अनुषंगाने, वरळीचे हे स्टोअर भारतातील पहिले सिटी स्टोर असेल.”
आयकियाची सजावटीची मस्त आयडिया!
- आयकिया ही घरातील फर्निचर आणि सजावटीच्या सामान विकणारी मोठी स्वीडिश कंपनी आहे.
- यापूर्वी आयकियाची पॅरिस, मॉस्को आणि शांघाय या शहरांमध्येही अशीच स्टोर्स आहेत.
- आयकियाने म्हटले वरळीमध्ये सिटी स्टोअर उघडल्यानंतर, मुंबईत आणखी एक सिटी स्टोअर उघडण्याची योजना आहे.
- सध्या आयकियाने मुंबई शहरामध्ये सिटी स्टोअर उघडण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
भारतीय बाजारपेठेच्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि पुढच्या वर्षी आणखी बरीच दुकाने उघडतील अशी त्यांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील हे स्टोअर ८०,००० चौरस फूटांवर पसरलेले असेल आणि २०२१ च्या अखेरीस याचे उद्घाटन करण्यात येईल.