मुक्तपीठ टीम
भारतीय अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा आता जागतिक स्थळावर होणार आहे. गेल्या वर्षी ही परीक्षा क्वालालंपूर, लागोस येथे झाली होती. यापूर्वी भारत सरकारच्या मदतीने १२ देशांमध्ये IIT-JEE परीक्षा घेण्यात आली आहे. प्रथमच, केंद्र सरकारची आयआयटी-जेईई मेन्स एकाच वेळी व्हिएतनाम, अमेरिकेसह २५ देशांमध्ये आयोजित करण्याची योजना आहे.
या वर्षी,NRI आणि परदेशात शिकत असलेल्या भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठीही सुमारे ३९०० अंडरग्रेजुएट आणि १३०० पदव्युत्तर जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही परिक्षा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, चीन, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशिया, बहरीन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती यासह इतर देशांमध्ये घेण्यात येईल. देशातील शीर्षस्थानी असलेल्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये या जागा राखीव असतील.
- JEE परीक्षांसाठी १३ वेगवेगळ्या भाषांना मान्यता देण्यात आली आहे.
- जेईई मेन्स परीक्षा या वर्षी जून आणि जुलैमध्ये दोन वेगवेगळ्या टप्प्यांत होणार आहे.
- जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा २० जूनपासून सुरू होत आहे.
परदेशी विद्यार्थ्यांना आयआयटी व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये प्रवेश
- एकूण जागांपैकी १५ टक्के जागा NITs, IIITs आणि केंद्रीय अर्थसहाय्यित तांत्रिक संस्थांमध्ये या योजनेसाठी शिक्षण मंत्रालयाकडून दिल्या जातील.
- DASA म्हणजेच परदेशातील विद्यार्थ्यांचा थेट प्रवेश योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.
- परदेशी विद्यार्थ्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट आणि इतर केंद्र सरकारच्या अनुदानीत तांत्रिक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकेल
- यामध्ये ट्रिपल आयटी आणि एनआयटीचाही समावेश आहे.
- मात्र, ही व्यवस्था आयआयटीमध्ये लागू होणार नाही.
- सध्या देशातील सर्व आयआयटी संस्थांना यापासून लांब ठेवण्यात आले आहे.
देशातील ६३ भारतीय दूतावासांशी संपर्क
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशांतील ६३ भारतीय राजदूतांशी संपर्क साधण्यात आला आहे.
- या देशांमध्ये जपान, नेदरलँड, रशिया, दक्षिण कोरिया, इटली, स्वीडन, स्वित्झर्लंड, तैवान, स्पेन, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, थायलंड, यूएई, अर्जेंटिना, ब्राझील, ग्रीस, सायप्रस, आइसलँड, तुर्कस्तान आणि अन्य देशांचा समावेश आहे.