मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून आगामी निवडणुकांमध्ये काय परिणाम दिसून येतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी ४८ पैकी ३० जागा जिंकू शकते, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस गटाला १८ जागांवर समाधान मानावे लागेल. हे सर्वेक्षण इंडिया टीव्ही आणि सी व्होटर्सने केले आहे. या सर्वेक्षणावर विश्वास ठेवला तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
नवे सरकार आवडले नाही!
- राज्यातील शिंदे फडणवीस सरकार जनतेला पसंत पडलेले नाही, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
- त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
- २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेनेने मिळून लोकसभा निवडणूक लढवली होती.
- त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या.
- यावेळी निवडणुका झाल्या तर त्यांना ४८ पैकी केवळ १८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
- ३० जागा थेट महाविकास आघाडीच्या खात्यात जाताना दिसत आहेत.
भाजपासाठी धोक्याचा इशारा!!
- शिंदे गटाने भाजपासोबत युती करत ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
- सध्या एकनाथ शिंदे यांना ५० आमदारांचा पाठिंबा आहे.
- मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात भाजप आणि मित्रपक्षाचे ३६ खासदार आहेत.
- तर उर्वरित खासदार हे उध्दव ठाकरे यांच्या गटासोबत आहेत.
- पण आज निवडणूका झाल्या तर इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपाच्या थेट ५० टक्के जागा घटणार आहेत.
त्यामुळे हा भाजपासाठी धोक्याचा इशारा आहे. - त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आली आहे.
‘मुक्तपीठ’ सरळस्पष्ट चर्चेत निवडणूक सल्लागार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला होता हाच अंदाज…
पाहा: