Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

September 27, 2022
in सरकारी बातम्या
0
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधनू गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान 1

मुक्तपीठ टीम 

गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र  आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसर स्वच्छता अभियानात सर्वजण सहभागी झाले आहेत. या उपक्रमास सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.        

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधनू  गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी नगरसेवक हर्षिता नार्वेकर,मकरंद नार्वेकर,पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, श्रीमती अमृता फडणवीस, सहायक संचालक धनंजय सावळकर,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त एस.के.गुरव, दिव्याज फाउंडेशन, ब्राईट फ्युचर या संस्थानी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग  घेतला.         

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छता अभियानास मोठ्या प्रमाणात गती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पर्यटनाला गती मिळावी. पर्यटन स्थळे अधिक सुंदर व्हावी यासाठी आपण भर देणार आहोत.आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसर अधिक सुंदर दिसेल. तुमचा सर्वांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे असे मतही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

स्वच्छ शहर म्हणून मुंबईला पारितोषिक मिळावे यासाठी आपण प्रयत्न करूया – अमृता फडणवीस             

अमृता फडणवीस म्हणाल्या,जिथे स्वच्छता नांदते तिथे शक्ती असते. आपला भारत, महाराष्ट्र व मुंबई हे स्वच्छ असावे यासाठी असे स्वच्छतेचे उपक्रम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत इंदोर या शहराने स्वच्छ शहर म्हणून आपला लौकीक राखला आहे. आगामी स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मुंबई शहर असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छतेचा आग्रह धरून देशात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले आहे. आपण देखील अशा छोटया उपक्रमातून स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न करूया, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.            

यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, अमृता फडणवीस, दिव्याज फाऊंडेशन तसेच नागरिकांनी परिसराची स्वच्छता केली.


Tags: cleanliness driveMangal Prabhat LodhaTourist place clean and beautifulपर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढापर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर
Previous Post

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात – राधाकृष्ण विखे-पाटील

Next Post

महाराष्ट्रातही पीएफआयचं जाळं, छापेमारीत धक्कादायक माहिती उघड!

Next Post
fresh-searches-against-pfi-leaders-in-maharashtra-

महाराष्ट्रातही पीएफआयचं जाळं, छापेमारीत धक्कादायक माहिती उघड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!