Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात – राधाकृष्ण विखे-पाटील

September 27, 2022
in सरकारी बातम्या
0
lumpy skin diseases

मुक्तपीठ टीम

संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला आहे. राज्यातील ३० जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.            

ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तत्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली. सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघापर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. ५ किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.            

लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी ३० हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी २५ हजार रुपये, लहान कारवडी असल्यास १६ हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.              

आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. १९.०९.२०२२ पर्यंत ८५,६२८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.  यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ५५,४४८ पंजाबमध्ये १७,६५५, गुजरात मध्ये ५,८५७, हिमाचल प्रदेशमध्ये ४३४७  व हरियाणामध्ये २३२१ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. महाराष्ट्रात दि. २६.९.२०२२ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील १६५, अहमदनगर जिल्ह्यातील ८४, धुळे जिल्ह्यात १७, अकोला जिल्ह्यात १४८, पुणे जिल्ह्यात ६६, लातूर मध्ये १०, औरंगाबाद – २३, बीड – १, सातारा जिल्ह्यात ६२, बुलडाणा जिल्ह्यात ९७, अमरावती जिल्ह्यात ११३, उस्मानाबाद – ३, कोल्हापूर – ४९, सांगली मध्ये १३,  यवतमाळ – १, सोलापूर- ७, वाशिम जिल्ह्यात ९, नाशिक – २, जालना जिल्ह्यात १०, पालघर – २, ठाणे-१०, नांदेड – ६, नागपूर जिल्ह्यात ३, रायगड – २, नंदुरबार – २  व वर्धा – २ असे एकूण ९०७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.

राज्यामध्ये दि. २६.०९.२०२२ अखेर अशा ३०  जिल्ह्यांमधील  एकूण १८४१ गावांमध्ये फक्त २७,४३१ जनावरांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण २७,४३१ बाधित पशुधनापैकी एकूण १०,५२८ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज दि. २६.९.२०२२ रोजी २५ लक्ष लस प्राप्त झाली असून, यानुसार आज अखेर एकूण १०६.६२ लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील १८४१ गावातील ४३.८० लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील २२.८९ लक्ष पशुधन अशा एकूण ६६.६९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. आज दि. २९.९.२०२२ रोजी एकूण ८.५४ लक्ष पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे.


Tags: lumpyLumpy Skin DiseasesLumpy VirusRadhaKrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीललम्पी त्वचा रोगलम्पी रोग
Previous Post

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार, तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार!

Next Post

पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधनू गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान 1

पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!