Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्या लखीमपूरमध्ये गांधी, यादव पोहचू शकले नाहीत, तिथं ममतांचे खासदार कसे पोहचले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mamata banerjee

मुक्तपीठ टीम

लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्याकांड प्रकरणी तिथं भेट देऊ पाहणाऱ्या विरोधी नेत्यांना अडवले जात आहे. योगी आदित्यनाथ सरकारने विरोधी नेत्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. मंगळवारी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि ११ काँग्रेस नेत्यांना शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या १४४ या कलमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. आपचे संजय सिंह, सपाचे अखिलेश यादव यांनाही अटकाव केला गेला. पंजाब, छत्तीसगड मुख्यमंत्र्यांनाही रोखण्यात आलं. मात्र असं असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लखीमपूरला जाऊन तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. त्यांनी यूपी पोलिसांना कशी झुकांडी दिली, त्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 

तृणमूल काँग्रेसच्या खासदारंनी असा दावा केला आहे की, त्यांनी पोलिसांना आपण पर्यटक असल्याचे भासवले आणि शेतकऱ्यांची भेट घेतली. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळातील खासदार काकोली घोष दस्तीदार, सुष्मिता देव, अबीरंजन बिस्वास, प्रतिमा मंडळ आणि डोला सेन यांचा समावेश होता.

  • तृणमूलने एका निवेदनात सांगितले की, जेव्हा त्यांना पोलिसांनी अडवले तेव्हा त्यांनी आपण पर्यटक असल्याचे सांगितले.
  • तृणमूलच्या नेत्या डोला सेन यांनी सांगितले की, ते रविवारपासून लखीमपूर खेरी गाठण्याचा प्रयत्न करत होते पण ते दोन दिवसांनी लखीमपूरला पोहोचले.
  • पालिया तहसीलमधील मृत शेतकरी लव्हप्रीत सिंगच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली.
  • तर दुसऱ्या मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी धौरहरा तहसीलमध्ये गेले.
  • दोघांचेही त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या आसाम मधील नेत्या सुष्मिता देव म्हणाल्या, “लखीमपूर खेरीमध्ये मारल्या गेलेल्या तरुण शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटून दुख: झाले. पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी काळे कायदे रद्द करण्यासाठी आणि भाजपा सरकारचे अन्याय थांबवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांनी सिंगूरमध्ये लढा दिला आणि भारतातील शेतकऱ्यांसाठी लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.”

 

भाजपा एका निरंकुश सरकारप्रमाणे सत्ता गाजवतेय

  • लोकसभा खासदार काकोली घोष दस्तीदार म्हणाल्या, “आरोपी हा बड्या राजकीय नेत्याचा मुलगा आहे, त्याने शेतकऱ्यांची हत्या केली आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे.
  • भारत लोकशाही देश आहे पण गेल्या काही वर्षांपासून देशातून लोकशाही गायब आहे.”
  • “भाजपा एका निरंकुश सरकारप्रमाणे सत्ता गाजवत आहे.
  • ते आरोपी वगळता निरपराध्यांना अटक करत आहेत.
  • त्यांनी पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले, पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये आहेत, पण ते लखीमपूर खेरीला आले नाहीत.
  • यातून सरकारचा हेतू समजतो.

Tags: akhilesh yadavBJPlakhimpurMamata Banerjeepriyanka gandhiतृणमूल काँग्रेसप्रियांका गांधीभाजपाममता बॅनर्जीयोगी आदित्यनाथशेतकरी हत्याकांड
Previous Post

“आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध!”: नाना पटोले

Next Post

शिर्डी साईबाबा, शनि शिंगणापूरचं दर्शन शक्य! वाचा ही नियमावली…

Next Post
temple

शिर्डी साईबाबा, शनि शिंगणापूरचं दर्शन शक्य! वाचा ही नियमावली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!