Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध!”: नाना पटोले

October 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
congress

मुक्तपीठ टीम

पारधी समाजाकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या समाजावर गुन्हेगारी समाज असा शिक्का मारला गेला आहे ती ओळख बदलून त्यांना माणूस म्हणून जगता आले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा वंचित, शोषित समाज घटकांना न्याय देणारा पक्ष असून राज्यातील आदिवासी पारधी समाजाच्या शिक्षण, रोजगार, राहण्याची सोय अशा सर्वांगिण विकासासाठी कट्टीबद्ध आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

टिळक भवन येथे आदिवासी पारधी महासंघाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले, त्यावेळी पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इंग्रजांच्या काळापासून पारधी समाजाकडे एक गुन्हेगारी समाज म्हणून बघितले जात असे स्वातंत्र्यानंतर त्यात बदल होत आहे, पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेस सरकारने या समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. शासनाच्या योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजही या समाजाचे काही प्रश्न, समस्या आहेत त्या मार्गी लावणे गरजेचे आहे त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक आयोजित करुन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करु.

 

यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष मुकेश साळुंके, समाधान साळुंके, रा. ना. सोनावणे, बन्सीलाल पवार, अनिल चव्हाण, संतोष पवार, बसोराम चव्हाण, सुरेश सोनावणे, सचिन साळुंके, सुकदेव डाबेराव, अशोक चव्हाण, अनिल माळे, सुधाकर पारधी हे पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

 

स्वतंत्र आदिवासी पारधी विकास मंडळाची स्थापना करणे, विधान परिषदेवर सदस्यत्व मिळावे, भूमिहिन बेघर आदिवासी पारधी समाजास शेत जमीन व घरकुल देऊन पुनर्वसन करावे. मुंबई, ठाण्यात फुटपाथ, सिग्नलवर, उड्डान पुलाखाली राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाचे ठाणे जिल्ह्यात राखीव क्षेत्रावर पुनर्वसन करावे. पारधी विकास आराखड्यासाठी पुरेसा निधी द्यावा, या मागण्यांचे निवेदन आप्पासाहेब साळुंके यांनी नाना पटोले यांना दिले.

 

या कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे नियोजन शारदा जगताप यांनी केले.

 


Tags: Congressmumbainana patoleनाना पटोलेमुंबई
Previous Post

“शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण, महसूल विभाग बदलण्याच्या मुद्यांचे पालन गरजेचे” 

Next Post

ज्या लखीमपूरमध्ये गांधी, यादव पोहचू शकले नाहीत, तिथं ममतांचे खासदार कसे पोहचले?

Next Post
mamata banerjee

ज्या लखीमपूरमध्ये गांधी, यादव पोहचू शकले नाहीत, तिथं ममतांचे खासदार कसे पोहचले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!