मुक्तपीठ टीम
भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील शिखरावरील कुबेरांपैकी एक आहेत. भारतातील या विश्वकुबेरांनी आधी अंबानी व आता टाटा समुहालाही मागे टाकले आहे. पण त्यांनी केलेली प्रगती ही विलक्षण गतिमान मानली जाते. त्यांच्याकडे या प्रगतीसाठी आलेला पैसा नेमका कुठून आणि कसा येत आहे, ते समजून घेवूया…
वयाच्या साठीत १५४ अब्ज डॉलर्सची संपत्ती!
- ६० वर्षीय गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५४.७ अब्ज डॉलर आहे.
- २०२२ मध्ये अदानी समूहाच्या एकूण मालमत्तेत सातत्याने वाढ झाली आहे.
- अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी जानेवारीपासून ६०.९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
अदानींच्या श्रीमंतीचे कारण…
- भाजपा विरोधक अदानींच्या संपत्तीवाढीमागे भाजपा नेत्यांचे कृपाशीर्वाद असल्याचे आरोप करतात.
- भाजपा सत्तेत आल्यापासूनटच अदानी समुहाची अतिभरभराट झाल्याने तसे आरोप होतात.
- पण हे राजकारण सोडले तर अदानींच्या श्रीमंत होण्यामागे गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे.
- शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या समभागांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
- अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये ३८६५.६० रुपये प्रति शेअरवर पोहोचले आहेत.
- त्याच वेळी, मार्केट कॅपच्या बाबतीतही कंपनीने नवीन उंची गाठत LIC आणि ITC सारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे.
- शेअर्सच्या वाढीमुळे या कंपनीचे मार्केट कॅप ४.३१ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले आहे.