Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघर ते सांगली…व्हॉट्सअॅपवर पसरणाऱ्या अफवा करतात घात! का कारवाई नाही?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
sadhus

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअॅपवर एक व्हायरल ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जातो की साधू आणि फकीरांच्या वेशात अपहरणकर्ते मुलांचे अपहरण करण्याच्या संधीच्या शोधात तेलंगणात फिरत आहेत. ऑडिओमध्ये पालक आणि शाळेतील शिक्षकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सांगलीमध्ये झालेल्या साधू मारहाण प्रकरणामागे अशीच ऑडिओ क्लिप जबाबदार असल्याची शक्यता आहे. पालघरमध्ये दोन साधूंची अमानुष हत्या झाली तेव्हाही तिथं व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप पोस्ट मुलांच्या अपहरणासाठी साधूंच्या वेशात टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरवत होत्या. मात्र, पालघरनंतर आता सांगलीतही गुन्ह्याच्या मुळापर्यंत जात अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेत कारवाई झालेली दिसली नाही.

राष्ट्रीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार अशा अफवांच्या ऑडिओ क्लिप्स, पोस्ट्स महाराष्ट्राशेजारील तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्येही पसरल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रालगतच्या सीमाभागांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घटना आणि व्हायरल अफवा यांचा संबंध शोधण्याची आणि त्यामागील खरे सूत्रधार शोधण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या ऑडिओत काय म्हटलं आहे?

  • व्हॉट्सअॅपमध्ये व्हायरल झालेल्या ऑडिओ बातम्यांमध्ये म्हटले आहे की, “गावकऱ्यांना आणि शहरवासीयांना, ही माझी चेतावणी आहे.
  • जर तुमचा मुलगा विद्यार्थी असेल आणि शाळा तुमच्या गावापासून दूर असेल, तर कृपया लक्ष ठेवा, अन्यथा, वाईट होऊ शकते.”
  • पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे की बाहेरून ४००-५०० गुंड आले आहेत आणि ही टीम सर्वत्र पसरली आहे. ते डोळे, किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी मुलांचे अपहरण करत आहेत.
  • अनेक वेशात हे गुंड तुमच्या गावात आणि शहरात येतात. जसे फेरीवाले, रद्दी विक्रेते, साधू आणि फकीर.
  • जर तुम्ही त्यांना याआधी कधी पाहिले नसेल तर तुमचा मुख्य दरवाजा बंद ठेवा आणि खिडकीतूनच त्यांच्याशी बोला. तुमच्याकडे पाळीव कुत्रा असेल तर त्याची साखळी उघडा आणि त्यांच्यावर सोडा, “

Tags: KidnappersmuktpeethPalgharSadhussangliWhatsApp Viral Audioअपहरणकर्तेकारवाईघडलं-बिघडलंपालघरमुक्तपीठव्हॉट्सअॅप व्हायरल ऑडिओसांगली
Previous Post

IDFC FIRST Bank and WhatsApp enable FASTag recharge through ‘payments on WhatsApp

Next Post

अदानींची विलक्षण गतिमान प्रगती! जाणून घ्या का वाढतेय विश्वकुबेरांची संपत्ती…

Next Post
Gautam Adani

अदानींची विलक्षण गतिमान प्रगती! जाणून घ्या का वाढतेय विश्वकुबेरांची संपत्ती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!