Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यार्थीनींचे अश्लील व्हिडीओ प्रकरण: नेमकं काय घडलं? विद्यार्थीनींमध्ये प्रचंड भीती, पण पोलीस म्हणतात…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
mohali

मुक्तपीठ टीम

पंजाबमधील एका खासगी विद्यापीठातील शिकणाऱ्या ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटनेने देशात खळबळ माजली. त्यातही ते व्हिडीओ एका विद्यार्थीनीनेच शूट करून पाठवल्याचा आरोप झाल्याने सर्वच हादरले. घटनेनंतर ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात आला. पण पोलिसांनी तो दावा फेटाळला. तसंच या प्रकरणात आरोप झालेल्या विद्यार्थीनीने फक्त स्वत:चाच व्हिडीओ बनवून तो मित्राला पाठवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय, ते स्पष्ट होत नसल्यानं वेगळंच गूढ निर्माण झालं आहे.

वसतिगृहातील मुलींनी व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणीची चौकशी केली आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. आरोपी विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, तिने दबावाखाली व्हिडीओ बनवले आहेत. या विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडीओ बनवून शिमला येथील मित्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

विद्यार्थीनींचा आक्रोश…वातावरण तणावपूर्वक!

  • विद्यार्थीनींनी निदर्शने सुरू केली आणि घोषणाबाजी सुरू केली. एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला, तर काहींची प्रकृती खालावली.
  • पोलिसांनी आरोपी विद्यार्थीनीला अटक केली आहे. त्याचबरोबर तिचा मित्र असणाऱ्या तरुणाला पकडण्यासाठी शिमल्याहून एक टीम पाठवण्यात आली आहे.
  • मात्र, एसएसपी विवेकशील सोनी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा इंकार केला आहे. आरोपी तरुणीने केवळ स्वतःचे व्हिडीओ पाठवले असल्याचे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
  • तसेच ते म्हणाले की, आंदोलनादरम्यान एका मुलीची प्रकृती खालावली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

महिला आयोगाकडून गंभीर दखल

  • घटनेची माहिती मिळताच पंजाब सरकारने कारवाई केली आणि आरोपींना सोडले जाणार नाही असे सांगण्यात आले.
  • पंजाब राज्य महिला आयोगाने विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना या प्रकरणी न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
  • या संपूर्ण प्रकरणाचे सत्य सात दिवसांत समोर येईल, असे आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी सांगितले. यासोबतच वसतिगृहाच्या वॉर्डनचीही चौकशी करण्यात येणार आहे.

Tags: Mohalimuktpeethobscene video viralPunjab Private UniversityStudent's pornographic video caseअश्लील व्हिडीओ व्हायरलघडलं-बिघडलंपंजाब खासगी विद्यापीठमुक्तपीठमोहालीविद्यार्थीनी अश्लील व्हिडीओ प्रकरण
Previous Post

अदानींची विलक्षण गतिमान प्रगती! जाणून घ्या का वाढतेय विश्वकुबेरांची संपत्ती…

Next Post

भाजपाकडून केजरीवालांना अण्णा हजारेंच्या ‘त्या’ उद्गारांची आठवण!

Next Post
भाजपाकडून केजरीवालांना अण्णा हजारेंच्या ‘त्या’ उद्गारांची आठवण!

भाजपाकडून केजरीवालांना अण्णा हजारेंच्या 'त्या' उद्गारांची आठवण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!