Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पडणारा रुपया तुमच्या-माझ्यासारख्यांचं घरचं बजेट कसं पाडतो?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rupees Dolar

मुक्तपीठ टीम

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात तसा रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होत असेलही, पण सामान्यांसाठी मात्र जे होते आहे, त्याचे परिणाम काय ते जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण अनेकदा असं वाटतं की रुपया घसरला, डॉलर चढला तर आपल्याला काय त्याचं, पण तसं नसतं. रुपयाच्या चढ-उताराचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावरही होतोच होतो. कसं ते समजून घेवूया…

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबताना दिसत नाही. बुधवारी रुपयाची पुन्हा एकदा ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाचा विनियम दर बुधवारी ८३ रूपयाच्याही पुढे गेला. रुपया ८३ च्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी मंगळवारीही रुपयामध्ये घसरण दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत रुपयात आणखी घसरण होऊ शकते. रुपयाच्या घसरणीचे सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.

परदेशातून होणारी आयात महागणार, ग्राहकोपयोगी वस्तू भडकणार!

  • परदेशातून आयातीसाठी आपण डॉलर्समध्ये व्यवहार करतो.
  • डॉलर महागला की पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागतात.
  • त्यामुळे देशात आयात होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंसाठीही जास्त रुपये मोजावे लागतात.
  • त्याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवरही होतोच होतो.
  • त्यावस्तू केवळ इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, वाहनं अशा नसतात तर औषधं, पुस्तकं, संगणक अशाही असू शकतात.

कच्च्या मालासाठी डॉलरपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार !!

  • रुपयाच्या घसरणीमुळे भारतीय उत्पादन महाग होण्याची शक्यता आहे.
  • परदेशातून येणाऱ्या कच्च्या मालासाठी डॉलरपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार आहेत.
  • त्याचबरोबर परदेशात मागणी मंदावल्याने विक्री करणेही कठीण होणार आहे.
  • अशा स्थितीत निर्यातीवर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांसाठी येणारा महिना अडचणींचा जाऊ शकतो.
  • एवढेच नाही तर परदेशातून येणारा सर्व माल देशांतर्गत बाजारपेठेत महाग होईल, त्यांच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर परदेशातून येतो.

तेल महागणार, खाद्यपदार्थ भडकणार!

  • भारत सुमारे५० टक्के खाद्यतेल आयात करतो ज्याचे मूल्य डॉलरमध्ये चुकवले जाते.
  • रुपयाच्या घसरणीमुळे खाद्यतेल महाग झाले आहे.

इंधनाच्या किंमती वाढल्याने महागाई भडकणार!

  • आपल्या देशात एलपीजी आणि पीएनजी गॅस बहुतांश आयात केला जातो.
  • रुपयाच्या घसरणीमुळे एलपीजी आणि पीएनजीही महाग होतील.
  • याशिवाय वाढत्या कच्च्या तेलांच्या किमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील, त्यामुळे उत्पादनांचा वाहतूक खर्च वाढेल.
  • वाहतूक खर्च वाढेल
  • त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे.
  • याशिवाय उत्पादनांच्या वाहतुकीच्या खर्चामुळे बहुतांश उत्पादनांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

उत्पादक कंपन्यांचा खर्च वाढणार, नफा घटणार!

  • कमजोर रुपयामुळे कंपन्यांसाठी आयात कच्च्या मालाची किंमत वाढेल.
  • याशिवाय परदेशातून कर्ज उभारणे त्यांना महागात पडणार आहे.
  • याची भरपाई करण्यासाठी कंपन्या उत्पादनांच्या किमती वाढवू शकतात, ज्याचा अंतिम भार ग्राहकांवर पडेल.
  • अर्थात त्याचा अर्थ कंपन्यांचा नफा वाढेलच असं नाही.

गुंतवणूकही परिणाम!

  • रुपयाच्या घसरणीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात.
  • यामुळे दुहेरी नुकसान होते.
  • स्वयंपाक, शिक्षण, वाहतूक खर्च वाढल्याने नेहमीच्या बजेटवर परिणाम होतो.
  • खर्च वाढल्याने कमाईतून बचत कमी होते.

Tags: budgetDollarIndianews2useRupeesडॉलरबजेटरुपया
Previous Post

शिंदे, फडणवीस आणि पवार एकत्र पाहून अनेकांची रात्रीची झोप उडू शकते -एकनाथ शिंदे

Next Post

थरूर निवडणुकीत पराभूत, पण पवार, पायलटांपेक्षा मिळवली जास्त मतं!

Next Post
shashi tharoor

थरूर निवडणुकीत पराभूत, पण पवार, पायलटांपेक्षा मिळवली जास्त मतं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!