मुक्तपीठ टीम
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल-डिझेल, अन्नधान्यांच्या किंमती वाढल्यानंतर आता साबण आणि डिटर्जंटच्या खरेदीसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने पुन्हा एकदा डिटर्जंट आणि साबणांच्या किमती वाढवल्या आहेत. या उत्पादनांच्या किंमती १७ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. एचयूएल गेल्या ६ महिन्यांपासून दर महिन्याला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहे. या काळात दरात सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनुसार म्हणणे आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे.
चहा-कॉफीच्या दरातही वाढ
- या आठवड्याच्या सुरुवातीला एचयूएलच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
- १४ मार्च रोजी एचयूएलने चहा आणि कॉफी उत्पादनांच्या किमतीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.
- यामध्ये ब्रू कॉफीच्या दरात ३ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- तसेच, इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किमतीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
- ब्रू गोल्ड कॉफी जारच्या किमतीतही ३ ते ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
- ताजमहाल चहाची किंमत ३.७ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आली आहे.
- सर्व प्रकारच्या ब्रुक बाँड चहाच्या किमती १.५ टक्क्यांनी १४ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- १४ मार्च रोजी किमतीत वाढ केल्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी वाढत्या खर्चामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले होते.
मॅगीचे दरही वाढले
- दुसरीकडे नेस्ले इंडियानेही मॅगीप्रेमींना दणका दिला आहे.
- मॅगीच्या दरात १६ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
- आता ७० ग्रॅम मॅगीचे पॅकेट १२ रुपयांऐवजी १४ रुपयांना मिळणार आहे.