Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनधिकृत बांधकाम पाडले, आता प्रतापगड पायथ्याला भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा! – हिंदू जनजागृती समितीची मागणी

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
SunilGhanwat

मुक्तपीठ टीम

गेले अनेक वर्षे न्यायालयाने आदेश देऊनही अफझलखानाच्या कबरी भोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही. या ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी यांची विविध आंदोलने झाली, शिवप्रेमींनी प्रसंगी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, तरी काँग्रेसी सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले; मात्र आज शिंदे-फडणवीस सरकारने शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला अफझलखानाच्या कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास आरंभ केला. अफजलखानाचा वधाच्या म्हणजेच ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास घेतले, या निर्णयाबद्दल हिंदु जनजागृती समितीकडून सरकारचे मनपूर्वक अभिनंदन ! छत्रपती शिवरायांनी जसा जुलमी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून महापराक्रम केला, याच प्रकारे छत्रपती शिवरायांचा पराक्रम दाबण्याचा आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या अनधिकृत बांधकामांचा शासनाने ‘कोथळा बाहेर काढला’ आहे. आत याच ठिकाणी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे आणि हा पराक्रमाचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट यांनी केली आहे.

छत्रपती शिवरायांचे सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करावेत !

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमण होणे, हे मोगलांचे उदात्तिकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमानच आहे. आज प्रतापगड पायथ्याचे अनधिकृत बांधकाम हटवले जात आहे, याचप्रकारे राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हटवावे, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हिंदु जनजागृती समिती गेली काही वर्षे या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे, जागृती करत आहे. कोल्हापूर येथील विशाळगडावर १००हून अधिक आर्.सी.सी. पद्धतीची अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तेथे रेहानबाबाचा दर्ग्याचे भव्य स्वरूपात नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. याचप्रकारे पुण्यातील लोहगडावर अनधिकृत थडगे बांधून उरूस साजरा केला जातो. ठाण्यातील मलंगगडावर झालेले अतिक्रमण असो वा किल्ले कुलाबा येथे बांधलेली अनधिकृत मजार असो, ज्या छत्रपती शिवरायांनी राज्यातील जुलमी इस्लामी पातशाह्या संपवून हिंदवी स्वराज्य स्थापले, त्यांच्या किल्ल्यांवर पुन्हा झालेले इस्लामी अतिक्रमणे ही छत्रपतींच्या पराक्रमाचा अपमान करणारीच आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षी असणार्‍या सर्वच किल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे काढण्याची मोहिम राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे.


Tags: Hindu Janjagruti SmaitiMaharashtraShiv Pratap Smarakशिवप्रताप स्मारकहिंदू जनजागृती समिती
Previous Post

लालू प्रसाद यादवांची लेक देणार पित्यासाठी किडनी…

Next Post

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

Next Post
Mumbai Grantotsav

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!