Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ग्रंथप्रेमींसाठी १६ नोव्हेंबरपासून दादरमध्ये ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Mumbai Grantotsav

मुक्तपीठ टीम

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ येत्या १६ व १७ नोव्हेंबर रोजी दादर (पू) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ग्रंथ विक्री केंद्रास भेट देण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.

”मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२२”चा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय, १७२, नायगाव, दादर (पू) येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत या ग्रंथोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, विक्री, ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याख्यान, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी ग्रंथ विक्री केंद्र उभारले जाणार आहेत.

वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचन व खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय मुद्रणालयाची विविध प्रकाशनं, राज्य मराठी विकास संस्था, दर्शनिका विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, साहित्य अकादमी, राष्ट्रीय पुस्तक न्यास इ. शासकीय संस्थांच्या विक्री केंद्रांचाही या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे.

कार्यक्रमांची रुपरेषा :

बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू) येथून निघणार असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, गोविंदजी केणी रोड ते महात्मा फुले रोड तद्नंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय रोड मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचणार आहे. दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके जन्म शताब्दी वर्षानिमित्त कवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांचे ‘कवितेतल्या शांताबाई’ या विषयावर व्याख्यान तर दुपारी ४ ते ५.३०वाजेपर्यंत सह्याद्री वाहिनीच्या वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांच्या मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे आणि समृद्धी दाखवणारा “शब्दांच्या गावा जावे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मराठीतील दुर्मीळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॅा. दिलीप बलसेकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वाजता भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ विद्यार्थ्यांना ग्रंथांचे वितरण माजी राज्यसभा सदस्य डॅा. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते होईल. सकाळी ११.३० ते १ वाजेपर्यंत ‘वाचन संस्कृती – काल, आज आणि उद्या’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागप्रमुख डॅा. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘ग्रंथोत्सव का व कशासाठी’ याविषयावर परिसंवाद होणार असून यात ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, संजय बनसोडे, बांद्राच्या चेतना व्यवस्थापन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॅा. सिद्धी जगदाळे व माहिम सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुषमा जोशी सहभागी होणार आहेत.

ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात ग्रंथालयातील बालसभासद, सर्वसाधारण व ज्येष्ठ नागरिक सभासद, वाचक, पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेत मुंबई केंद्रातील गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा प्रातिनिधिक सत्कार केला जाणार आहे. त्यांनतर ग्रंथोत्सव कार्यक्रमाचा समारोप होईल.

या ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक अच्युत गोडबोले असून खासदार राहुल शेवाळे, आमदार कालीदास कोळंबकर, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी दिली आहे.


Tags: good newsGood news MorningMumbai Grantotsavउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयमुंबई शहर ग्रंथोत्सवमुंबई शहर ग्रंथोत्सव २०२२
Previous Post

अनधिकृत बांधकाम पाडले, आता प्रतापगड पायथ्याला भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा! – हिंदू जनजागृती समितीची मागणी

Next Post

‘जीवन सुंदर आहे’ : १२ ते २० नोव्हेंबर दरम्यान पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव

Next Post
P L Deshpande Kala ahotsav

‘जीवन सुंदर आहे’ : १२ ते २० नोव्हेंबर दरम्यान पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!