Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रणव रॉय ‘इंडिया’ आणि विनोद दुआ ‘भारत’

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, प्रेरणा, विशेष
0
Pranav Roy & vinod dua

हेरंबकुलकर्णी

हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल…

विनोद दुआ गेल्यावर ते मला का आवडायचे आणि त्या आवडण्याची सुरुवात कधी झाली ? याचा मी विचार करू लागलो. तेव्हा लक्षात आले की विनोद दुआ सर्वसामान्य माणसाला आवडायला त्यांचे निवडणूक विश्लेषण कारणीभूत होते.

बहुदा त्याची सुरुवात १९८९ ला असावी. विश्वनाथ प्रतापसिंग यांचे ग्लॅमर असलेली ती निवडणूक. त्यावेळी दूरदर्शन नुकतेच भरात आले होते आणि प्रणव रॉय यांच्या कंपनीला लोकसभा निवडणूक विश्लेषणाचे काम दिले होते (त्यावेळीचे १७ लाख रुपये हे लक्षात आहे )
त्याकाळात ही कल्पनाच नवीन होती की देशभर जिल्ह्याजिल्ह्यात रिपोर्टर उभे करून live निवडणूक निकाल, संगणकाच्या सहाय्याने निवडणूक मतांची टक्केवारी, त्याचे विश्लेषण आणि स्टुडिओत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा.

त्यावेळी प्रणव रॉय इंग्रजीत बोलायचे प्रणव रॉय यांचे कठीण इंग्रजी त्यातही त्यांचे उच्चारही परदेशी पद्धतीचे अत्यंत हळू बोलायचे.
त्यामुळे त्यांचे बोलणे समजत नसायचे आणि ते काय बोलतात याची जाम उत्सुकता मात्र असायची. अशावेळी विनोद दुआ नावाचे ‘गाईड'( !!! ) सर्वसामान्य भारतीयांच्या मदतीला यायचे. प्रणव राय खूप वेळ जे कठीण इंग्रजीत बोलले ते अगदी थोडक्यात अतिशय गोड हिंदीत विनोद समजून सांगायचे.. त्यामुळे प्रणव रॉय हा इंडिया तर विनोद दुआ भारत असे वाटायचे..राहणीमान ही तसेच. प्रणव रॉय थ्री पीस मध्ये तर विनोद आपले भारतीय जाकीट व नेहरू शर्टमध्ये. एकदम आपला माणूस वाटायचे.

प्रणव रॉयचा त्या विद्यार्थी दशेत इतका राग यायचा की हा माणूस इतका कठीण का बोलतोय ? आणि विनोद दुवा मात्र हसत-हसत अगदी छान पैकी हिंदीत त्यांचे म्हणणे सांगायचे… त्यात काही राजकीय नेते इंग्रजीतून बोलायचे आणि बराच वेळ इंग्रजी चालले की विनोद दुवांना प्रणव इशारा करायचे आणि विनोद त्यांचे म्हणणे अगदी थोडक्यात सांगायचे.

विनोदचे कौतुक त्यांच्या हिंदीसाठी करावे की सारांश सांगण्याबद्दल करावे असा प्रश्न पडायचा कारण कधी कधी लांबलचक बोललेल्या परिच्छेदाचे ते एक ते दोन वाक्यात सारांश सांगायचे इतकी त्यांची हुकूमत होती… विनोद यांची ही पहिली ओळख कायमस्वरूपी मनात राहिली.

प्रणव रॉय इंडिया होते तर विनोद भारत होते इंडिया विरुद्ध भारत ही मांडणी एकत्र अनुभवत यायला सतत निवडणूक यावी असे वाटावे इतका तो सुंदर अनुभव होता.

सामान्य माणसात विनोद यांच्या लोकप्रियतेची ही सुरुवात होती…की जी पुढे उंचावतच गेली!

 

(हेरंब कुलकर्णी हे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आहेत. )

 


Tags: election analystsenior journalistvinod duaनिवडणूक विश्लेषण. ज्येष्ठ पत्रकारविनोद दुआ
Previous Post

मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे जगातील सर्वात मोठा ‘तिरंगा’!

Next Post

आयआयटी जोधपूरचे उपयोगी संशोधन, मुक्या दिव्यांगांसाठी बोलणारे हातमोजे!

Next Post
IIT Jodhpur

आयआयटी जोधपूरचे उपयोगी संशोधन, मुक्या दिव्यांगांसाठी बोलणारे हातमोजे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!