Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआयटी जोधपूरचे उपयोगी संशोधन, मुक्या दिव्यांगांसाठी बोलणारे हातमोजे!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
IIT Jodhpur

मुक्तपीठ टीम

शारीरिकरित्या कमतरता असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे आपण परिपूर्ण व्हावे असे वाटत असते. उच्चार क्षमता नसणाऱ्या व्यक्तींसाठी आता परिपुर्ण होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तंत्रज्ञानाचे हे पुढचे पाऊल सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) जोधपूर आणि ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) जोधपूर या दोन संस्थानी बोलणाऱ्या हातमोज्यांचे संशोधन केले आहे. बोलता न येणाऱ्या मुक्या दिव्यांगांसाठी हे हातमोजे संवाद साधण्याचा उत्तम मार्ग ठरू शकतात.

 

  • मुक्या दिव्यांगांसाठी कमी किमतीचे ‘बोलणारे हातमोजे’ विकसित करण्यात आले आहेत.
  • हे ग्लोब आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) च्या तत्त्वांवर आधारित आहेत.
  • आपोआप भाषा उच्चार तयार करण्यासाठी कार्यरत असतील.
  • या उपकरणामुळे मूक व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती यांच्यात संवाद साधण्याची सोय होईल.
  • IIT जोधपूर आणि AIIMS जोधपूर कडून पेटंट मिळालेले हे नवोपक्रम या क्षेत्रात चालू असलेल्या कामाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

 

हातमोजे व्यक्तींना हाताचे जेश्चर मजकूरात किंवा पूर्व-रेकॉर्ड केलेल्या आवाजात रूपांतरित करण्यात मदत करू शकते. सांकेतिक भाषा ही अशा लोकांसाठी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. जे बोलण्याच्या नैसर्गिक क्षमतेपासुन वंचित आहेत किंवा जे आजारपण किंवा दुखापत झाल्यामुळे बोलू शकत नाहीत, त्यांसाठी या उपकरणाच्या माध्यमातून इतरांप्रमाणे संवाद साधने शक्य आहे.

 

या उपकरणाचा टिकाऊपणा, वजन, प्रतिसाद आणि वापर सुलभता यासारख्या वैशिष्ट्यांमध्ये वाढ करण्यासाठी आयआयटी टीम आणखी काम करत आहे. विकसित उत्पादनाची विक्री आयआयटी जोधपूरच्या स्टार्टअपद्वारे केली जाईल.

 

बोलणाऱ्या हातमोज्यांचे कार्य

  • या उपकरणातील इलेक्ट्रिकल सिग्नल सेन्सर्सच्या पहिल्या संचाद्वारे तयार केले जातात.
  • हे उपकरण वापरकर्त्याच्या हाताच्या अंगठ्यावर, बोटावर आणि/किंवा मनगटावर घातले जाते.
  • हे विद्युत संकेत बोटांच्या, अंगठ्याच्या, हाताच्या आणि मनगटाच्या हालचालींच्या संयोगाने तयार होतात.
  • त्याचप्रमाणे दुसरीकडे सेन्सरच्या दुसर्या संचामधून विद्युत सिग्नल तयार केले जातात.
  • हे चिन्हांच्या या संयोजनांचे वाक्य आणि शब्दांच्या संबंधित ध्वन्यात्मकतेमध्ये भाषांतर करते.
  • सिग्नल्सची निर्मिती मुक व्यक्तींना इतरांशी संवाद साधण्यास सक्षम करते.

Tags: Dumb DivyangGood news MorningIIT JodhpurIndian Institute of Technologymuktpeethtalking glovesआयआयटी जोधपूरइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचांगल्या बातम्याबोलणारे हातमोजेमुक दिव्यांगमुक्तपीठ
Previous Post

प्रणव रॉय ‘इंडिया’ आणि विनोद दुआ ‘भारत’

Next Post

शेतकरी, बेरोजगार तरुण, महिलांसाठी स्वयंरोजगार साधनांची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांंसाठी असा करा अर्ज

Next Post
pashu sauvardhan

शेतकरी, बेरोजगार तरुण, महिलांसाठी स्वयंरोजगार साधनांची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांंसाठी असा करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!