Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे जगातील सर्वात मोठा ‘तिरंगा’!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, विशेष
0
World's biggest tricolour in mumbai (2)

मुक्तपीठ टीम

मुंबईसह देशभरातील नौदलाच्या सर्व तळांवर नौदल दिन साजरा होत असताना, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाद्वारे मुंबईतील नौदल गोदी येथे जगातील सर्वात मोठा भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा झळकवण्यात आला आहे. प्रथमच असा प्रचंड मोठा ध्वज फडकवण्यात आला आहे. तो पाहून ‘झंडा उँचा रहे हमारा’ ही मुंबईकरांची, पर्यटकांची भावना व्यक्त होत आहे.

 

जगातील सर्वात मोठा तिरंगा

World's biggest tricolour in mumbai (3)

२२५ फूट लांब आणि १५० फूट रुंदीच्या या ध्वजाचे वजन सुमारे १४०० किलो आहे आणि तो खादीपासून बनवलेला आहे. शनिवारी येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा या महाकाय तिरंग्याकडे आणि ‘गेट वे आॅफ इंडिया’कडे पाहताना, ऊर अभिमानाने भरून आला होता.
या भव्यदिव्य ध्वजातून भारतातील प्रतिष्ठित गेटवे दिसत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’याचा भाग म्हणून खादी आणि ग्रामोद्योग आणि आयोगाने त्याची संकल्पना आणि निर्मिती केली आहे.

 

नौदलाचा राष्ट्रसेवेला समर्पित संकल्पाचा पुनरुच्चार!

World's biggest tricolour in mumbai (4)

  • भारतीय नौदलाने नौदल दिनानिमित्त राष्ट्राच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
  • या स्मारकाच्या प्रदर्शनाच्या छोट्या पण महत्त्वाच्या संदेशाद्वारे नौदलाने एकप्रकारे राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण आणि संवर्धन शिवाय भारतीयांची सेवा करण्याच्या आपल्या प्रतिज्ञा आणि वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
    डोळे दिपवून टाकणारा हा राष्ट्रीय झेंडा पाहिल्यानंतर गेट वे आॅफ इंडियाच्या परिसरात आलेले मुंबईकर आणि स्थानिक , परदेशी पर्यटक आश्चर्याने थक्क झाले.
  • अगणित पर्यटक आणि स्थानिकांनीही या झेंड्याचे छायाचित्र, छबी मोबाईल, कॅमेरांच्या सहाय्याने टिपण्याची संधी सोडली नाही.
  • ‘गेट वे’च्या विशाल प्रांगणात नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने सायंकाळी अत्यंत महत्वाचा ‘ बिटिंग रिट्रीट’ सोहळा आयोजिला होता. त्यावेळीही या भव्य ध्वजाचे ‘मोठेपण’ ठळकपणे उठून दिसत होते.

World's biggest tricolour in mumbai (1)


Tags: mumbaiNavynavy dayWorld's biggest tricolourजगातील सर्वात मोठा तिरंगानौदलनौदल दिनमुंबई
Previous Post

राज्यात ७८२ नवे रुग्ण, ७७० रुग्ण बरे होऊन घरी! 

Next Post

प्रणव रॉय ‘इंडिया’ आणि विनोद दुआ ‘भारत’

Next Post
Pranav Roy & vinod dua

प्रणव रॉय 'इंडिया' आणि विनोद दुआ 'भारत'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!