मुक्तपीठ टीम
कोरोना साथीचा रोग सर्व देशभर पसरलेला आहे. त्यातही मुंबई महानगर तर याचा सर्वांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. मुंबईच्या कचरा वेचकांच्या गटाला या काळात कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. काही कचरा वेचक या काळात रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी क्लीन-अप फाऊंडेशनने शहरातील आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी जागरूकता मोहीम राबविली. तसेच कोरोना लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण केली. हा उपक्रम राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोहिमेचा भाग होता. तो मुंबई मनपाच्या ‘एच’ वेस्ट वॉर्डमध्ये आसरा वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.. या उपक्रमात डॉक्टरही सहभागी झाले.
या उपक्रमामागे कचरावेचकांना सहजपणे उपलब्ध नसणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. तसेच काही स्वच्छतेचे नियम समजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. डॉ. जितेंद्र पाटील यांनी आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेबद्दल सल्ला दिला. त्यांनी कोरोना लसीकरण व त्याचे सुरक्षिततेसाठीचे महत्त्वही सांगितले. युवा प्रतिष्ठानने या कचरा वेचकांमध्ये वर्तन बदलावर लक्ष केंद्रित करणार्या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने स्किटचे आयोजन देखील केले होते. उपस्थित कचरावेचकांना 3-प्लाय कपड्याच्या मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच काम करत असताना अनिवार्य वैयक्तिक संरक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल जागरूक केले गेले.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना क्लीन-अप फाऊंडेशनच्या सह-संस्थापक संजना रूनवाल म्हणाल्या की, “कचरा वेचकांना सहजपणे उपलब्ध नसणाऱ्या गोष्टी उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर उद्भवणार्या समस्या आणि त्या समस्येचा सामना करण्यास मदत करण्यासाठी मानसिक आरोग्यावर एक सत्र आयोजित केले. आता, लसीकरण सुरू झाल्यानंतर, आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी किंवा फायद्याविषयी जागरूक करण्यासाठी हा प्रयत्न आहे.
पाहा व्हिडीओ: