Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज-उद्या जाऊ नका बँकेत…किती मोठा आहे बँकांचा संप?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bank strike

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी आज सोमवारपासून (१५, १६ मार्च) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधून चालणाऱ्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

बँकांचा संप किती मोठा?

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी आहेत.
  • महाराष्ट्रातील दहा हजारांपेक्षा जास्त शाखांमधील अंदाजे पन्नास हजार बँक अधिकारी आणि कर्मचारी दोन दिवसांच्या संपात सहभागी होत आहेत.
  • अधिकारी-कर्मचारी संपावर जात असलेल्या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात.
  • सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून संपाची सुरुवात झाली.
  • मंगळवार, १६ मार्च रोजी रात्री बारापर्यंत बँकांचे कामकाज बंद राहील.
  • बँकांच्या संपात सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात घोषणा केली होती. त्यामुळे कर्मचारीवर्गात रोजगार सुरक्षेविषयी भीती निर्माण झाली. तीन बैठकांमध्ये चर्चा केल्यानंतरही मार्ग काढण्यात आला नसल्याने अधिकारी-कर्मचारी वर्गात सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातूनच संपाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

संपात कोणत्या संघटना सहभागी?
• ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन
• नॅशनस कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज
• ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन
• ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन
• इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस
• इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन
• नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स
• नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स
• बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया


Tags: bank privatisationbank strikeCentral Government Of Indiafinance minister nirmala sitharamanअर्थमंत्री निर्मला सीतारामणबँक संपबँकांचे खासगीकरण
Previous Post

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी गणित, भौतिकची नाही गरज

Next Post

मुंबईच्या कचरावेचकांना आरोग्य जागरूकतेचे प्रशिक्षण

Next Post
health awareness

मुंबईच्या कचरावेचकांना आरोग्य जागरूकतेचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!