मुक्तपीठ टीम
आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजूने निकाल देत आता आता शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आर्थिक आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला कडवट विरोध केला असल्याने त्यांनी EWS आरक्षणाचे केलेले स्वागत चर्चेचा विषय ठरले आहे.
आर्थिक आरक्षणाबाबत गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
- सर्वच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा फायदा होईल.
- भारतीय संविधान हे या देशाचं गार्डियन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आज आर्थिक निकषामधला आर्थिक आरक्षणाचा जो निकाल दिलेला आहे तो सर्वांच्या हिताचा आहे.
- जात, धर्मांच्या नावावर आरक्षणाच्या राजकारणाला पूर्णविराम दिला आहे.
- यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य करतो आणि स्वागत करतो.
आरक्षणाचा मराठा समाजातील लोकांनी यांचा फायदा होणार? यावर गुणरत्न सदावर्ते यांचे वक्तव्य
- आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण म्हणजे एका जातीला याचा फायदा होईल असं नाही आहे.
- हे आरक्षण जे आर्थिक दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अशा वर्गासाठी आहे. याचा केवळ मराठा समाजाला फायदा होईल यासाठी नाही.
- बरेचसे वर्ग, जे आरक्षणाच्या कक्षेत येत नाहीत. मग ते ब्राम्हण असतील, वैश्य असतील, क्षत्रीय असतील त्या सगळ्यांसाठी आणि त्यासोबतच एससी, एसटी, ओबीसी वर्गीतील लोक जे कर्नाटक, गुजरात किंवा इतर राज्यातून महाराष्ट्रात येतात त्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळेल.
- यामुळे हे आरक्षण केवळ मराठा समाजाच्या उन्नतीसाठी नाही तर, सर्वांच्या उन्नतीसाठी आहे.