Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरेंचं वक्तव्य, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर! मध्यावधीची हूल की चाहूल?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde And Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. मध्यावधी निवडणुकांच्या अंदाजामागे काय लॉजिक आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. त्यामुळेच मध्यावधीची हूल की चाहूल खरंच लागत आहे, हे मांडण्याचा प्रयत्न.

मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय?

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघमध्ये आयोजित कोकण महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
  • आम्हाला निवडणुकांची भीती नाही.
  • निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही.
  • तसंच, मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात?
  • आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत.
  • आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे.
  • काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे.
  • आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे.
  • निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात.
  • त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात.
  • आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा.
  • तसेच उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.
  • राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मध्यावधीची हूल की चाहूल?

राजकीय वर्तुळात मध्यावधी निवडणुकांविषयी २ मतप्रवाह आहेत:

मतप्रवाह -१

  • एकनाथ शिंदे यांना लाभलेलं मुख्यमंत्रीपद ही थेट दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद असल्यानेच हे उघड आहे.
  • त्यामुळे कमी आमदार असूनही त्यांना ते पद दिलं आहे.
  • दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असल्याने त्यांना धोका नाही, पद कायम तर सत्ता भक्कम आणि मग मध्यावधीची शक्यताच नाही, असं एक मत मांडलं जातं.

मतप्रवाह -२

  • दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असले तरी ते त्यांची गरज भागेपर्यंतच राहतील, ती भागत नाही, असं लक्षात आलं की कृपाछत्रही जाईल, असंही काहींना वाटतं.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लेखी मुद्दे, युक्तिवाद, संदर्भ प्रकरणे निकाल, पुरावे मागितलेआहेत, याचा अर्थ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागणं शक्य आहे.
  • जर संविधानाच्या १०व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार न्यायालयानं विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर आमदारांवर पद गमावण्याचं संकट ओढवू शकतं.
  • जर १६ आमदार अपात्र ठरले तरी सत्ता कायम राखण्यासाठी विरोधी पक्षातून देवेंद्र फडणवीसांनी आवश्यक कुमक तयार ठेवल्याची चर्चा आहे.
  • पण तशा अस्थिर परिस्थितीत पुन्हा फोडाफोडी करून माथ्यावर कलंक घेण्यापेक्षा, भाजपा नव्याने लोकांपुढे जाण्याचा पर्याय निवडू शकते.
  • अर्थात हा पर्याय निवडायचा की नाही, ते गुजरात, हिमाचल प्रदेश या २ राज्यांच्या निकालावर अवलंबून आहे, अशीही चर्चा आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Cm Eknath ShindeMid Term ElectionUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमध्यावधी निवडणुक
Previous Post

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंकडून EWS आरक्षण निकालाचे स्वागत!

Next Post

एरोसोल प्रदूषणात महाराष्ट्र अतिधोकादायक रेडझोनमध्ये पोहचण्याची भीती!

Next Post
Maharashtra forecasted to enter ‘highly vulnerable’ red zone for aerosol pollution in 2023

एरोसोल प्रदूषणात महाराष्ट्र अतिधोकादायक रेडझोनमध्ये पोहचण्याची भीती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!