Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

EWS आरक्षण निकालाच्या माध्यमातून नव्या रितीने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न: प्रकाश आंबेडकर

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
prakash ambedkar

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने लागू केलेलं १० टक्के आर्थिक आरक्षण वैध असून घटनाविरोधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संताप व्यक्त केला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून नव्या रितीने मनुस्मृतीला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

  • हा निर्णय इंटेलेक्टच्युअली करप्ट जजमेंट अर्थात बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय असल्याचं म्हटलं आहे.
  • दुसऱ्याबाजूला दुसऱ्या नव्यारितीने मनुस्मृतीची सुरुवात झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
  • दोन गोष्टी मिसआऊट झाल्या आहेत आणि त्याचं उत्तर कुठेच सापडत नाहीय.
  • संविधानाने आर्टिकल १६ मध्ये बॅकवर्ड क्लासेस वापरलं आहे.
  • संसदेत एकदा याबाबत स्पष्टीकरण देताना कास्ट हा शब्द का वापरला नाही, त्यावेळी बाबासाहेबांनी उत्तर दिलं होत की आय डोन्ट वॉण्ट टू टाय डाऊन दिस कंट्री टू कास्ट, चळवळी झाल्या पाहिजेच म्हणून क्लास हा शब्द वापरला.
  • आर्टिकल ३४१ मध्ये शेड्यूल्ड ऑफ कास्ट म्हटलं आहे, शेड्यूल कास्ट म्हटलेलं नाही.
  • तर शेड्यूल्ड ऑफ कास्ट ज्या जाती त्यात सहभागी केलेल्या आहेत त्याची नियमावली किंवा त्याचं असणार शेड्यूल अशी परिस्थिती आहे.
  • आता त्याच्या पुढे जाऊन आपण त्यामध्ये बघितलं तर त्या आर्टिकलमध्ये इनक्लूड आणि एक्सक्लूड करण्याची प्रोविजन आहे.
  • असं आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने कास्टलेस सोसायटीकडे जाण्याची परिस्थिती आहे.

मागच्या दाराने मनुस्मृती आली आहे…

  • कास्टलेस सोसायटीकडे जाण्याची परिस्थिती असताना इकॉनॉमिकली वीकर सेक्शन निर्माण करणं हा संविधानाच्या मूलभूल तत्त्वांच्या विरोधात आहे.
  • संसदेची ही घटनादुरुस्ती परिच्छेद ३६७ च्या विरोधात आहे.
  • या निर्णाने मागच्या दाराने मनुस्मृती आली आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची व्याख्या नमूद करताना जात हा आधार नाही तर आर्थिक परिस्थिती आहे.
  • पण उरलेल्या ओबीसी, एसटी, एससीना विशेष आरक्षण मिळतं म्हणून त्यांना यातून वगळणं हे तत्व आर्टिकल १४ च्या विरोधात आहे.
  • उरलेल्या आरक्षणात सुद्धा आर्थिक निकष येण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे एससी, एसटी यांनी जो काही बदल करायचा, तो सुचवला पाहिजे.
  • तसेच, त्यांनी सावधान राहावे कारण सर्वोच्च न्यायालय त्यांच्या बाजूने नाही.
  • सर्वोच्च न्यायालयातील पुर्ण विचारसारणी बदलली आहे.
  • सामाजिक पेक्षा आर्थिक विषमतेला ते अधिक महत्व देत आहेत.

Tags: central govtEWS reservationPrakash Ambedkarईडब्ल्यूएस आरक्षणकेंद्र सरकारप्रकाश आंबेडकर
Previous Post

ईडब्ल्यूएस आरक्षणाला वैध ठरवणाऱ्या निकालाचा मराठा आरक्षणाच्या लढाईत फायदा!

Next Post

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंकडून EWS आरक्षण निकालाचे स्वागत!

Next Post
Gunaratna Sadavarte

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंकडून EWS आरक्षण निकालाचे स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!