मुक्तपीठ टीम
नोकरी सोडताना आता थोडा विचार करावा लागेल. जे कर्मचारी नोटीस पीरियड पूर्ण न करता काम करत असलेल्या कंपनीतील नोकरी सोडतात त्यांना आता १८% जीएसटी भरावा लागेल. अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, अशा कर्मचाऱ्यांकडून पगार आणि इतर सुविधांच्या भरपाईच्या वसुलीवर कंपनीने १८% जीएसटी आकारावे. ते सरकारकडे जमा करण्याची कंपनीची जबाबदारी असेल.
कर्मचाऱ्याला नोटीस पीरियडमध्ये मिळणाऱ्या पगारावरही जीएसटी भरावा लागेल. याशिवाय कंपनीला समूह विमा आणि टेलिफोन बिल यांसारखे शुल्क वसूल करण्याचा अधिकार असेल आणि त्यावर जीएसटी देखील भरावा लागेल. निर्धारित नोटिस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जीएसटी वसूल करून सरकारच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी नियोक्त्याची असेल. हा कर त्या कालावधीत कर्मचाऱ्याला मिळालेल्या पगारासह इतर सर्व देयकांवर लागू होईल.
नोटीस पगारावर जीएसटी वसुली
- कर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्याने नोटिस पीरियड पूर्ण केला नसेल तरच पगारावरील जीएसटी वसूल केला जाऊ शकतो.
- अन्यथा, त्या कंपनीला कर्मचाऱ्याच्या पगारावर जीएसटी भरावा लागेल.
- नोटीस पीरियड कर्मचार्यांना ऑफर लेटरमध्ये नमूद केलेला असतो, जो एक ते तीन महिन्यांपर्यंत असू शकतो.