Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ

दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

May 18, 2022
in सरकारी बातम्या
0
Governor presides over 27th Convocation of Open University 2

मुक्तपीठ टीम

मुक्त व दूरस्थ शिक्षण हे आधुनिक युगातील ज्ञानग्रहणाचे पसंतीचे माध्यम झाले आहे. आज अनेक खासगी विद्यापीठे व शिक्षणसंस्था देखील दूरस्थ शिक्षणाचा उपयोग करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.            

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.             

यावेळी नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषि वित्त महामंडळाचे अध्यक्ष व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ चारुदत्त मायी, कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.            

ज्ञानदान प्रक्रियेचा वेदकाळापासून आढावा घेताना आगामी काळात मुक्त विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. मुक्त विद्यापीठाला नॅकचे ए मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.        

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या नावाने अध्यासन केंद्रे सुरु करावी : उदय सामंत            

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्थापनेपासून ५० ते ६० लाख पदवी प्रदान करण्यात आल्या असल्याचे सांगून मुक्त विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता इंदोर, गोवा, हैद्राबाद, दुबई यांसह मराठी लोक जेथे आहेत तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.            

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मुक्त विद्यापीठाने त्यांच्या नावांचे अध्यासन सुरु करावीत अशी सूचना मंत्री श्री. सामंत यांनी केली.              

दीक्षांत समारंभात १७६११३ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी व  पीएच डी प्रदान करण्यात आल्या.


Tags: २७वा दीक्षांत समारंभgovernor bhagat singh koshyariYashwantrao Chavan Maharashtra Open Universityदूरस्थ शिक्षणयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करा – हसन मुश्रीफ

Next Post

राजीनामा देताना हार्दिक पटेलांकडून भाजपाची प्रशंसा, काँग्रेसवर वार!

Next Post
Gujrat congress

राजीनामा देताना हार्दिक पटेलांकडून भाजपाची प्रशंसा, काँग्रेसवर वार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!