Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजीनामा देताना हार्दिक पटेलांकडून भाजपाची प्रशंसा, काँग्रेसवर वार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gujrat congress

मुक्तपीठ

गुजरात विधानसभा निवडणुकीआधी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. यांसदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि पाटीदार नेते असलेले हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा देत काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी त्यांनी नाव न घेता मोदी सरकारचे कौतुकही केले आहे. त्यामुळेच आता हार्दिक पटेल भाजपामध्ये जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ट्विटरवरून दिली राजीनाम्याची माहिती….

हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून राजीनाम्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. माझा विश्वास आहे की, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

चिकन सँडविचवर काँग्रेस नेत्यांचे लक्ष…

  • हार्दिक पटेल यांनी पुढे लिहिले की, अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्ष देश आणि समाजाच्या हिताच्या विरुद्ध काम करत असल्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे.
  • देशातील तरुणांना सक्षम आणि कणखर नेतृत्व हवे आहे, मात्र काँग्रेस पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे.
  • देशातील जनतेला विरोध नाही, तर भविष्याचा विचार करणारा पर्याय हवा आहे.
  • आमचे कार्यकर्ते स्वखर्चाने ५०० ते ६०० किमीचा प्रवास करून जनतेत जातात आणि दिल्लीतील नेत्याला चिकन सँडविच वेळेवर मिळाले की नाही, याकडे गुजरात काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे लक्ष असते.”

मोदींचे केले मनभरून कौतुक!!

  • हार्दिक पटेलने थेट मोदी सरकार किंवा भाजपाचे नाव घेतले नाही, परंतु आपल्या राजीनाम्यात त्यांनी लिहिले की, अयोध्येत राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असो, काश्मीरमध्ये कलम ३७० असो किंवा जीएसटी लागू करण्याचा निर्णय असो. देशाला दीर्घकाळापासून या समस्यांवर तोडगा हवा होता आणि काँग्रेस पक्ष त्यात अडसर ठरत राहिला.
  • पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.
  • मी जेव्हा-जेव्हा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाला भेटलो तेव्हा गुजरातच्या लोकांपेक्षा त्यांचे लक्ष त्यांच्या मोबाईल आणि इतर गोष्टींकडे जास्त असल्याचे दिसून आले.
  • देशावर संकट आले तेव्हा आमचे नेते परदेशात होते.

Tags: gujratHardik PatelModi govtकाँग्रेसगुजरातभाजपामोदी सरकारहार्दिक पटेल
Previous Post

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ

Next Post

राज्यात ३०७ नवे रुग्ण, २५२ रुग्ण बरे! मुंबई १९४, नाशिक १, नागपूर १ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ३०७ नवे रुग्ण, २५२ रुग्ण बरे! मुंबई १९४, नाशिक १, नागपूर १ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!