Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टार्ट अप्ससाठी सरकारचा १५ लाखांचा रोख पुरस्कार, १५ मार्चपूर्वी अर्ज करा!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Startup

मुक्तपीठ टीम

स्टार्ट अप म्हणजे भारतातील कौशल्याला, नवकल्पनांना त्यांच्या कक्षा रुंदावण्याची संधी. अनेक तरुणांनी याचा लाभ घेत नवी व्यवसाय भरारी घेतली आहे. आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून आता राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सुरु करण्यात येत आहेत. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने तिसऱ्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार योजनेची सुरुवात केली आहे आणि त्यासाठी अर्ज मागविले आहेत. प्रत्येक वर्गातील विजेत्यांना पाच लाखांचे तर विजेत्या इनक्यूबेटरला आणि विजेत्या एक्सीलरेटरला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. १५ मार्च २०२२ पर्यंत राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज करता येतील.

 

याआधी दोन वर्षांच्या पुरस्कारांच्या यशस्वी आयोजनानंतर राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ५० उप-क्षेत्रांमध्ये हे वर्गीकृत केले असून १७ क्षेत्रांमधील स्टार्टअपसाठी हे पुरस्कार दिले जातील. यात कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि कौशल्य विकास, ऊर्जा, उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, फिनटेक, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि निरामय जीवन, उद्योग ४.०, माध्यम आणि मनोरंजन, सुरक्षा, अंतराळ, वाहतूक आणि प्रवास यांचा समावेश आहे.

 

याव्यतिरिक्त, सात विशेष श्रेणी स्टार्टअपसाठी देखील आहेत

  • महिलांनी सुरू केलेले स्टार्टअप
  • ग्रामीण भागात प्रभाव करणारे
  • कॅम्पस स्टार्टअप
  • उत्पादन सर्वोत्कृष्टता
  • महामारीशी लढा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करणारे (प्रतिबंधक, निदान, उपचारात्मक, देखरेख, डिजिटल कनेक्ट, घरून काम करण्यासाठी) स्टार्टअप
  • तोडगा देऊ करणारे, भारतीय भाषांमध्ये कार्यालयीन व्यवस्था कार्यरत करणारे स्टार्टअप
  • ईशान्येकडील स्टार्ट अप्स

 

स्टार्टअपची मजबूत यंत्रणा उभी करण्यासाठी महत्वाचा भाग कारणीभूत ठरणाऱ्या असामान्य इनक्यूबेटरला आणि एक्सीलरेटर्सला देखील नॅशनल स्टार्टअप पुरस्कार २०२२ देण्यात येईल.

 

प्रत्येक विजयी स्टार्टअपला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. विजेते आणि उपविजेते-अप यांना देखील आपला संभाव्य प्रायोगिक प्रकल्प सादर करण्यासाठी, तसेच आपला उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची संधी मिळेल.

 

विजेत्या इनक्यूबेटरला आणि विजेत्या एक्सीलरेटरला १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. १५ मार्च २०२२ पर्यंत राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२ साठी अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी www.startupindia.gov.in/content/sih/en/nsa2022.html या संकेतस्थळाला भेट द्या.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cash prizesgood newsgovernmentmuktpeethNational Startup Award 2022start upsstartupindiaचांगली बातमीमुक्तपीठराष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२२रोख पुरस्कारसरकारस्टार्ट-अप्स
Previous Post

जमिनीवर मारा करणाऱ्या ‘ब्राह्मोस’ या विस्तारित पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Next Post

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्ससाठी नवी सुविधा, इंटरनेटविना करता येणार मेसेज

Next Post
wa

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्ससाठी नवी सुविधा, इंटरनेटविना करता येणार मेसेज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!