मुक्तपीठ टीम
टिकटॉक, पब्जीसारख्या अनेक चीनी अॅप्स आणि आनलाईन गेम्सवर भारतात बंदी घालण्यात आली. आता सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप’ या परदेशी सोशल अॅपला पर्याय निर्माण करण्यासाठी सरकारने ‘संदेस’ (SANDES) हे भारतीय मॅसेजिंग अॅप लाँच केले आहे. संदेस हे अॅप व्हॉट्सअॅप अॅपसारखा कार्य करते. युर्जसना मॅसेज, फाईल शेअर करण्यासाठी संदेस अॅप मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार आहे.
इलेक्ट्रॉनिक आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने भारतीय मॅसेजिंग अॅपची निर्मिती केली आहे. गुगल प्ले स्टोअरसह अॅपलच्या अॅप स्टोअरमध्येदेखील हा अॅप उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. संदेस अॅप वापरकर्ते मोबाईल नंबर अथवा ईमेल आयटी टाकून अॅपचा वापर करु शकतात. सध्या, सरकारी कर्मचारी आणि सरकारी कार्यालयात संदेस अॅपचा वापर केला जात आहे. राजीव शेखर यांच्या मते, संदेस अॅप हा ओपन सोर्स बेस्ड सिक्योर क्लाउड एनबेल्ड प्लॅटफॉर्म आहे. या अॅपवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे.
संदेस अॅपचे फीचर्स
- सिंगल चॅट
- ग्रुप मॅसेजिंग
- फाईल शेअरिंग
- ऑडिओ, व्हिडीओ कॉलची सुविधा
सरकारी अॅप असलं तरी संदेसचाही एंड टू एंड एन्क्प्टेड मॅसेजिंगचा दावा
- आयटी विभागाच्या नॅशनल इन्फोमॅटिक्स सेंटर (एनआयएस)ने 20 ऑगस्ट रोजी संदेस अॅपचे पहिले व्हर्जन लाँच केले.
- गुगल प्ले स्टोअरवर या अॅपची माहिती देण्यात आली आहे.
- संदेस अॅप हे एंड टू एंड एन्क्प्टेड मॅसेजिंग, एन्क्रिप्टेड बॅकअप आणि एन्क्रिप्टेड ओटीपी सेवेसह आहे, असा दावा करण्यात आला आहे.
- केंद्र सरकारच्या नियमांद्वारे अॅपची गोपनियता आणि डेटा पॉलिसी नियंत्रित केली जाईल.
- ‘संदेस’ सध्या सरकारी कामकाजातच!
- अॅपच्या व्हेरिफिकेशनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागातील किंवा मंत्रालयातील नोडल अधिकाऱ्यासोबत संपर्क साधावा लागेल.
- संदेस अॅप हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असून संपूर्ण भारतीयांसाठी हे अॅप कधी वापरात आणला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.