Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आपलं नागपूर, प्रदूषणमुक्त नागपूर! नितीन गडकरींचं पंचवार्षिक लक्ष्य!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nitin gadkari

मुक्तपीठ टीम

नागपुरातील जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक इंधन – सीएनजी, एलएनजी, इथेनॉलचे पंप उघडण्यात येत असून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारले जात आहे. येत्या ५ वर्षात सर्व प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आतंरराष्ट्रीय मानक नागपूर शहर पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करीत नागपूर देशातील सर्वात सुंदर आणि हरित शहर निर्माण होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. . नागरिकांनीही ‘हरित नागपुर ‘ बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले .

 

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित महावृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते आज मिहानमधील भारतीय आयुर्विविज्ञान संस्‍था- एम्स येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.

nitin gadkari

सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, ग्रीन बस, सीएनजी, एलएनजी असे विविध प्रकल्‍प पहिल्‍यांदा राबवून आ‍पण नागपूर शहराला ‘इको फ्रेंडली’ केले असून आता शहराला ध्‍वनीप्रदूषण मुक्‍त करण्‍याची जबाबदारी जनतेसह आपण सर्वांची आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

 

नागपुरातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन तर्फे पूर्व विदर्भात यंदा ५० हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एम्सच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

nitin gadkari

गडकरींकडून ग्रीन अर्थचं कौतुक

  • प्रा. अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ फाउंडेशनच्‍या माध्यमातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनाचे मोठे काम केले आहे.
  • त्‍यांनी आता परिवहन क्षेत्राकडे लक्ष द्यावे आणि गाड्यांच्‍या हॉर्नच्‍या आवाजांवर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रयत्‍न करावे.
  • जेणेकरून ध्‍वनी प्रदूषण कमी होईल, अ‍से ग्रीन अर्थ फाउंडेशनच्‍या कार्याचे कौतूक करताना नितीन गडकरी म्‍हणाले.

विदर्भात ५० हजार झाडे…ज टॅगिंगही!

  • प्रा. अनिल सोले यांनी ग्रीन अर्थच्‍यावतीने मागील सात वर्षांपासून राबविण्‍यात आलेल्‍या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
  • वृक्षदिंडीच्‍या माध्‍यमातून पूर्व विदर्भात आजपर्यंत जी झाडे लावण्‍यात त्‍यांचे संवर्धन करण्‍यात येत आहे.
  • आगामी काळात ५० हजार झाडे लावण्‍यात येतील असा संकल्‍प त्‍यांनी यावेळी केला.
  • ज्‍या भागात झाडे लावण्‍यात येतील, त्‍यांना जियो टॅगिंग करणार असल्‍याचे आश्‍वासनही त्‍यांनी यावेळी दिले.

nitin gadkari

या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी एम्‍सच्‍या संचालिका डॉ. विभा दत्‍ता होत्या तर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्‍मे, आमदार नागो गाणाार, आमदार परिणय फुके, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाला एम्सचे विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, ग्रीन अर्थ संस्था, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.


Tags: nagpurNitin Gadkariकेंद्रीय मंत्री नितीन गडकरीग्रीन अर्थ फाउंडेशनजियो टॅगिंगनागपुरनागपूरचे महापौर दयाशंकर तिवारीप्रा. अनिल सोलेवृक्षदिंडी
Previous Post

ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधुचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिनंदन

Next Post

‘व्हॉट्सअॅप’ला भारतात सरकारी पर्याय ‘संदेस’ अॅप…आहे तरी कसं?

Next Post
sandes WhatsApp

‘व्हॉट्सअॅप’ला भारतात सरकारी पर्याय ‘संदेस’ अॅप...आहे तरी कसं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!