Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वय-अनुभवानं नवे, पक्षातही नवे, तरी काँग्रेस देणार उमेदवारीची संधी!

पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी काँग्रेसला पाहिजेत हिंमतवान!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेस आपली रणनिती आखत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं विधान चर्चेत आहे. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. त्याचवेळी इतर पक्षांच्या हिंमतवान नेत्यांना काँग्रेसची दारे उघडी असल्याचे विधान राहुल गांधी यांनी दोन आठवड्यांपूर्वी केले होते. काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, राहुल गांधींच्या या विधानातून काँग्रेसच्या बदलत्या रणनीतीचे संकेत मिळत आहेत.

 

मिशन २०२२साठी काँग्रेसची रणनीती

  • राहुल गांधींनी मांडलेल्या भूमिकांमुळे काँग्रेसची रणनीती स्पष्ट होत असल्याचे नेत्यांना वाटते.
  • काँग्रेस २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘हिंमतवान’ उमेदवारांना प्राधान्य देणार आहे.
  • काँग्रेस आगामी निवडणुकीत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल.
  • गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमधल्या अनेक तरुण नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे काँग्रेसचा चेहरा तरुण, उत्साही दाखवण्याची भूमिका आहे.
  • त्याचबरोबर पक्षात नवीन चेहरे नसल्यामुळे जुन्या चेहऱ्यांना संधी देणे भाग पडत आहे, त्याचा फटका बसतो. त्यामुळे प्रसंगी इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाही संधी देण्याचा निर्णय झाला आहे.

 

वय-अनुभवानं नवे, पक्षातही नवे…चालतील!

  • इतर पक्षांमधून येणाऱ्यांसाठी काँग्रेसची दारे उघडी आहेत.
  • पक्षाने इतर पक्षांच्या नेत्यांना संघटनेत महत्त्वाची पदेही दिली आहेत.
  • यामध्ये नाना पटोले (मूळ काँग्रेस पण भाजपमधून पुन्हा स्वगृही), नवज्योतसिंग सिद्धू (मूळ भाजपा) आणि रेवंत रेड्डी (मूळ तेलुगू देशम) यांचा समावेश आहे.
  • हे नेते काही वर्षांपूर्वीच काँग्रेसमध्ये आले आहेत.
  • पण त्यांना नव्या रणनीतीनुसारच मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात.

 

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, भाजपा हा मोठा पक्ष कसा झाला आहे? अनेक पक्षातील नेत्यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. अशावेळी जर एखाद्या भाजपा नेत्याने राजीनामा देण्याचा धोका पत्करला तर त्याच्या हिंमतीला दाद देण्यासाठी संधी दिलीच पाहिजे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, पंजाब वगळता आमदार आणि नेत्यांना राजीनामे दिले आहेत, त्यामुळे पक्षाला नवीन चेहऱ्यांची गरज आहे.


Tags: BJPCongressrahul gandhiकाँग्रेसभाजपाराहुल गांधीविधानसभा निवडणुका
Previous Post

‘व्हॉट्सअॅप’ला भारतात सरकारी पर्याय ‘संदेस’ अॅप…आहे तरी कसं?

Next Post

आता महसूल सेवांचं डिजिटलीकरण! पंधरा रुपयात ऑनलाईन ७-१२ नव्या स्वरुपात!

Next Post
balasaheb thorat 1

आता महसूल सेवांचं डिजिटलीकरण! पंधरा रुपयात ऑनलाईन ७-१२ नव्या स्वरुपात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!