Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

इथेनॉल प्रकल्पांसाठी सरकारी तेल कपंन्यां एकवटल्या, त्रिपक्षीय एस्क्रो करारावर स्वाक्षऱ्या!

May 13, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Ethanol

मुक्तपीठ टीम

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) भारतातील आगामी इथेनॉल समर्पित प्रकल्पांसाठी दीर्घकालीन खरेदी करार (एलटीपीए) केला आहे. याचा फायदा इथेनॉल प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना होणार आहे.

बिहारच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव संदीप पौंडरिक (आयएएस), भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अश्वनी भाटिया आणि बीपीसीएलचे कार्यकारी संचालक आय/सी, विपणन कॉर्पोरेट, सुखमल जैन यांच्या उपस्थितीत ओएमसी, प्रकल्प प्रवर्तक आणि संबंधित इथेनॉल प्रकल्पांच्या बँकांमध्ये त्रिपक्षीय-अधिक-एस्क्रो कराराच्या (टीपीए) पहिल्या संचावर स्वाक्षरी करण्यात आली.

भारतीय स्टेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि इंडियन बँक या तीन बँका या त्रिपक्षीय करारामध्ये ओएमसी आणि प्रकल्प प्रवर्तकांसह सहभागी आहेत. इथेनॉल प्रकल्पांना मिळणारा निधी या बँकांनी दिलेल्या वित्तपुरवठ्यासाठी वापरला जाईल याची खातरजमा करण्यासाठी कराराची रचना करण्यात आली आहे.

या करारानुसार, केन्द्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमा अंतर्गत या इथेनॉल समर्पित प्रकल्पाद्वारे तयार केलेले इथेनॉल, पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी ओएमसींना विकले जाईल. इथेनॉलच्या पुरवठ्यासाठीचा निधी नियोजनानुसार कर्जाची सेवा सुनिश्चित करण्यासाठी वित्तपुरवठा बँकेकडे ठेवलेल्या एस्क्रो खात्यात जमा केला जाईल.

मायक्रोमॅक्स बायोफ्युएल्स प्रा. लि., बिहार, इस्टर्न इंडीया बायोफ्युएल्स प्रा. लि., बिहार, मुझफ्फरपूर बायोफ्युएल्स प्रा. लि., बिहार, केपी बायोफ्युएल्स प्रा. लि., मध्य प्रदेश आणि विसाग बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड, मध्य प्रदेश यांच्याबरोबर त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.

भारताने इथेनॉल पुरवठ्यात वर्ष २०२१-२२ मध्ये, १८६ कोटी लिटर इथेनॉलचा वापर केला. यात ९.९०% इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला. यामुळे ९००० कोटींहून अधिक परकीय चलनाची बचत झाली.

तथापि, सरकारने २०२५ पर्यंत २०% मिश्रित इथेनॉल साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते सामान्यतः E२० लक्ष्य म्हणून ओळखले जाते. हे लक्ष्य गाठण्यात इथेनॉलची तूट हे मोठे आव्हान आहे. E२० चा विचार करता, २०२५-२६ मध्ये लक्ष्य गाठण्यासाठी देशाला १०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. पण, सध्याच्या उपलब्धतेनुसार इथेनॉलची तूट अंदाजे ६५० कोटी लिटर इतकी आहे. या पाच प्रकल्पांमुळे दरवर्षी सुमारे २३ कोटी लिटर इथेनॉल तयार होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Bharat Petroleum CorporationEthanol ProjectGood news MorningHindustan Petroleum CorporationIndial Oil Corporation Limitedtripartite escrow agreementइथेनॉल प्रकल्पत्रिपक्षीय एस्क्रो करार
Previous Post

‘युवा टुरिझम क्लब्स’ स्थापन करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाला सीबीएसईची साथ!

Next Post

आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये ४० डिजिटल हेल्थकेअर अॅप्स एकत्रित

Next Post
Ayushman Bharat Digital Mission

आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये ४० डिजिटल हेल्थकेअर अॅप्स एकत्रित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!