अपेक्षा सकपाळ
पन्नास वर्षांपूर्वी भारताने इतिहास घडवला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली आणि भारतीय सेनाप्रमुख जनरल मानेकशां, इतर सेनादलं यांच्या बळावर भारतानं जगाच्या नकाशात एका नवा देश कोरला. भारताने पाकिस्तानच्या लाखभर सैनिकांना गुडघे टेकायला लावत, पराभव करून पूर्वेला नवा देश निर्माण केला. शत्रूला भारताच्या दुर्गेसारख्या पराक्रमी नेतृत्वासमोर शरणागती पत्करावी लागली.
वास्तविक १९७१ चे युद्ध पाकिस्तानने कुरापत काढून सुरू केले होते. पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या स्थानकांवर हवाई हल्ले करण्यात आले. भारत कधी कोणावर स्वत: विनाकारण हल्ला करत नाही. शतकानुशतकांच्या इतिहासात भारताने कधी कुणाची आगळीक काढल्याची नोंद नाही. पण जर कोणी संकटात दिसलं, तर भारत मागे राहत नाही. कुणी उपाशी दिसलं तर भारत घासातील घास काढून देतो. कुणी वाट्याला गेलं तर भारत अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही. पाकिस्तानी कुरापतीनंतर तेच घडलं. अवघ्या तेरा दिवसांच्या संघर्षात भारताने पाकिस्तानचा पराभव करून पूर्वेला बांग्लादेश जन्माला घातला.
आज पाकिस्तानी जोखडातून पूर्व बंगालमधील बंगाली भाषिकांना मुक्त करून भारताने बांग्लादेश घडवला. तो दिवस १६ डिसेंबरचा. ‘विजय पर्व’ला ५० वर्षे पूर्ण झाली असल्यानं २०२१मधील या विजय दिवसाला वेगळंच महत्व! या दिवशी भारताने पाकिस्तानचा पराभव करून पूर्वेला नवा देश निर्माण केला. पंतप्रधान इंदिरा गांधी देशाचं नेतृत्व करत असताना भारतीय लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील भारताने लढलेली लढाई इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली.
पाकिस्तानचं अवघ्या तेरा दिवसांत कंबरडं मोडलं!
- पाकिस्तान पूर्व बंगालमधील आपल्याच नागरिकांवर अमानुष अत्याचार करत होता.
- त्यांचे हक्क डावलले जात होते. त्यांच्यावर सातत्यानं अन्याय केला जात होता.
- १९७०च्या निवडणुकीत पूर्व बंगालमधील मुजिबर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लिगला बहुमत मिळूनही सत्ता नाकारण्यात आली.
- निर्वासितांचे लोंढे सुरु झाल्याने भारताला दखल घेणे भाग होते.
- त्यातच १९७१मध्ये पाकिस्तानने कुरापतींना सुरुवाक केली.
- भारताने स्वाभाविकच चोख प्रत्युत्तर दिले.
- ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ या काळात भारत पाकिस्तान युद्ध झाले.
- अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानच्या एक लाख सैनिकांनी शरणागती पत्करली.
एक लाख सैनिकांची शरणागती…आणि पाकिस्तानी स्मृतिचिन्ह!
- भारताने विजय पर्वावर एक प्रदर्शन आयोजित केले होते
- १९७१ च्या भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर तत्कालीन पूर्व पाकिस्तानी लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल ए के नियाझी यांनी भारतीय लष्कराला पिस्तूल आणि त्यांची मर्सिडीज बेंझ कार सोपवली होती.
- भारताच्या महाविजयातील भारतीय पराक्रमाची पाकिस्तानच्या भेदरटपणाची ही दोन स्मृतिचिन्हं लोकांना नेहमीच आवडतात.
- यावेळीही भारतीय पराक्रमाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भव्य ‘विजय पर्व’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
- इंडिया गेट गार्डन येथे आयोजित या कार्यक्रमात सुमारे ७५ हजार लोक सहभागी झाले होते.
सशस्त्र दलांनी भारताच्या शक्तीचं दर्शन घडवलं!
- सशस्त्र दलांनी कलारीपायट्टू (भारतीय मार्शल आर्ट) आणि खुकरी कवायती केल्या.
- याशिवाय युद्धात वापरल्या जाणार्या विविध प्रकारच्या तोफा, उपकरणे आणि इतर लष्करी आयुधही मांडण्यात आले.
- युद्ध स्मृतिचिन्हांच्या प्रदर्शनामध्ये १६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांच्या आत्मसमर्पणानंतर जप्त करण्यात आलेल्या पाकिस्तानी लष्कराचे ध्वज, तोफा, रणगाडे आणि आयुध यांचा समावेश आहे.
- पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी ढाका येथे भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे चीनमधील जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.
- जनरल नियाझी यांची मर्सिडीज-बेंझ कार, त्यांची पिस्तूल आणि १९७१च्या युद्धात भारतीय लष्कराने विजय मोहिमेची योजना आखली होती तो नकाशा हेही मुख्य आकर्षण होते.
सुवर्ण विजय मशालींच्या स्वागत समारंभात पंतप्रधान मोदी उपस्थित
- पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर सुवर्ण विजय मशालींच्या स्वागतात सहभागी झाले आहेत.
- १९७१च्या युद्धातील भारताच्या विजयाच्या आणि बांगलादेशच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ सुवर्ण विजय वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी सुवर्ण विजय मशाली प्रज्वलित केला होता.
- नॅशनल वॉर मेमोरियल येथे शाश्वत ज्योतीतून पंतप्रधान मोदींनी चार मशाल पेटवल्या होत्या.
- पीएमओने सांगितले की, पंतप्रधानांनी चार पेटवल्या होत्या, ज्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या होत्या.
- तेव्हापासून या चार मशाल सियाचीन, कन्याकुमारी, अंदमान आणि निकोबार बेटे, लोंगेवाला, कच्छचे रण, आगरतळा आदींसह देशाच्या अनेक भागात गेल्या आहेत.
- या मशाल प्रमुख युद्ध क्षेत्र आणि शौर्य पुरस्कार विजेते आणि १९७१च्या युद्धातील दिग्गजांच्या घरी नेण्यात आल्या.