Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“मराठी उद्योजकांनो, लबाड व्यापाऱ्यांचा मुकाबला कसा कराल?”

December 25, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
“मराठी उद्योजकांनो, लबाड व्यापाऱ्यांचा मुकाबला कसा कराल?”

डॉ. गिरीश जाखोटिया / व्हा अभिव्यक्त!

नमस्कार मित्रांनो ! साधारणपणे प्रत्येक समाजात व देशात लबाड व्यापारी असतात. यांचा अनुभव नसलेले तरुण उमदे उद्योजक हे यांच्याकडून फसवले जातात. मराठी माणूस (बहुदा राजकारणातला वगळता) हा साधारणपणे सरळमार्गी असतो. लबाड व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना हा सरळमार्गीपणा बऱ्याच वेळा अडचणीचा ठरतो. ‘सरळमार्गीपणा’ हा उत्तम गुण आहे परंतु लबाडांशी व्यवहार करताना सावध रहायलाच हवं. यासाठी लबाड व्यापाऱ्यांच्या लबाड्या व त्यांची एकूण मानसिकता इथे थोडक्यात समजावून घेऊयात. लबाडांच्या घरात पहिला गुण मुलांमध्ये रुजवला जातो तो “उपयोगितेच्या सिद्धांता”चा. याबाबतीत लबाड व्यापारी हे ‘भावनाशून्य’ असतात. खातापिता – उठताबसता हे व्यापाराचाच विचार करीत असल्याने तुमची फारशी उपयोगिता नसेल तर हे खुबीने तुम्हाला विशिष्ट अंतरावर ठेवतील. तुमची उपयोगिता छान असल्यास हे तुमचं वारेमाप कौतुक करत राहतील. अशा कौतुकाने तुम्ही विरघळलात की ‘दानशूर’ होता, हे त्यांना माहीत असतं. तुमचा उपयोग एकदाच करून घ्यायचा असेल तर हे लोक तुम्हाला वापरून फेकून देतील. याबाबतीत हे टोकाचे निष्ठूर असतात. तुमच्या विद्वत्तेचं कौतुक करीत तुमच्याकडील उद्योजकीय कल्पना हे हातोहात बळकावतील. (बऱ्याच मराठी माणसांना त्यांच्या विद्वत्तेचं कौतुक केलेलं आवडतं, हे या लबाडांना पुरतं ठाऊक असतं.)

 

“व्यापाराच्या संधीं”वर हात मारताना लबाड व्यापारी जवळची नाती सुद्धा विसरून जातात. अशी संधी बळकावताना हे ‘साम – दाम – दंड – भेद’ हुशारीने वापरतात. अशा वेळी हे स्वतःच्या देवांना सुद्धा घाबरत नाहीत. ‘आस्तिकपणा’चा व ‘देशभक्ती’चा हे प्रचंड आव आणतात. वरकरणी दिसायला व वागायला हे ‘सात्विक’ वाटतात. ही एक ‘रंगसफेदी’ असते. सांस्कृतिक – धार्मिक कार्यक्रमांचा आपली ‘इमेज’ जपण्यासाठी हे अत्यंत धूर्तपणे उपयोग करतात. बऱ्याचदा लबाडांच्या परिवारातील एक भाऊ ‘फ्रंट’ला राहून ‘सुसंस्कृत’ अशी छवी तयार करतो आणि बाकीचे भाऊ या छवीचा भ्रष्ट वापर व्यापारासाठी करीत रहातात. सुसंस्कृत (?) भाऊ हा सामाजिक कार्यात व देणग्या देण्यात पुढे असतो. अर्थात शंभर रूपये भ्रष्ट मार्गाने कमवून पाच रुपये दान करणे सहजशक्य असते. अशा दानधर्माची “शोगिरी” करण्यात हे मोठे वस्ताद असतात. यांचा बख्खळ फायदा करून देणाऱ्या प्रभावी प्रशासकीय अधिकारी, राजकारणी व धार्मिक गुरुंच्या संस्थांना बहुतांश देणग्यांचा रतीब यांच्याकडून घातला जातो.

 

हे ढोंगी लोक “बराबरीच्या लोकां”शीच संबंध ठेवतात. असे करताना हे सतत समोरच्याची ‘औकात’ जोखत असतात. आपल्यापेक्षा खूपच मोठी औकात असणाऱ्याशी हांजीहांजी करण्यात हे निष्णात व निलाजरे असतात. यांच्या सामाजिक कार्यक्रमांत मोठी व्यापारी औकात असणारा ‘प्रमुख पाहुणा’ हा प्राधान्याने बोलवला जातो. ‘धनराशी’ जो प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे देईल तो यांच्यासाठी ‘परमपूज्यनीय’ असतो. व्यापारात निरूपयोगी असलेले अथवा आपल्या औकातीचे नसलेले नातेवाईकही हे दूर ठेवतात. नात्यांना लबाडीने वापरण्याचा किंवा भिरकावून देण्याचा हा सहजस्वभाव पिढ्यानपिढ्या (वारसाहक्काने!) यांच्या परिवारात चालत आलेला असतो. धूर्तपणाने हे व्यापारी कामासाठी छुप्या पद्धतीने परधर्मीयांशी संबंध ठेवतील परंतु राजकीय – सामाजिक अशा सामुदायिक वागण्यात त्याच परधर्मीयांना बेफाम शिव्या घालतील ! अर्थात यासाठी टोकाचा कोडगेपणा व कृतघ्नता लागते. बहुतेक वेळा “मी वाचलो पाहिजे, समोरचा खड्ड्यात गेला तरी चालेल”, ही प्राथमिक मानसिकता यांचा सहज व्यवहार असतो.

 

प्रत्येक छोट्या – मोठ्या व्यवहाराचा “कॉस्ट – बेनिफीट अन्यालिसिस” करण्यात हे पटाईत व वेगवान असतात. व्यापारी गणित यांचे कमालीचे पक्के असते. अशा विश्लेषणात यांना जरा जरी शंका आली तरी हे विश्वास न दाखविता, एखादे पचेल असे कारण देत व्यवहारापासून नम्रतेने दूर होतात. असे करताना हे बौद्धिक चर्चा टाळतात कारण ती गैरसोयीची असते. एखादा व्यापाराचा करार करताना हे दूरदर्शी (!) लोक करारातील काही जागा मोघम ठेवतात, म्हणजे तशीच वेळ आल्यास वचनपूर्ती करायला लागू नये ! इथे सुद्धा वाटाघाटी करताना यांची मानसिक चिकाटी ही अमर्याद असते. स्वतःचा अपेक्षित फायदा मिळेपर्यंत हे वाटाघाटी लांबवतात. व्यापारी संबंधात समोरची आसामी खूपच वरचढ असेल तर हे वेळ मारुन नेतात. अशा वरचढ माणसाची वारेमाप स्तुती करत हे धंद्याची इप्सित गुपिते व फायदे हडपतात. बऱ्याचदा उपकारकर्त्याला सुद्धा हे कोलतात. ‘स्वमग्नता’ आणि त्यासाठी काहीही करण्याची यांची तयारी असते. असे करताना कायदेशीर खबरदारी हे घेतातच. कायदेशीर पळवाटा शोधण्यात यांच्याशी स्पर्धा करणे खूप अवघड असते!

 

‘मॅनीप्युलेशन’ करण्यात लबाड व्यापारी हे माहीर असतात. खर्च वाढवून दाखविणे, खाजगी खर्च उद्योगाच्या नावे दाखविणे, जवळच्या नातेवाईकांना भरमसाठ पगार देणे, अकौंटिंग न करता खरेदी – विक्री करणे, बँकेचे कर्ज एका उद्योगासाठी घेऊन दुसऱ्या उद्योगात वापरणे, उद्योगातील खेळते भांडवल काढून स्टॉक मार्केट मध्ये सट्टा खेळणे, स्वतःचेच भांडवल कर्जाऊ घेतले म्हणून दाखविणे, पुढाऱ्यांचे व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काळे धन बेमालूमपणे वापरणे, निरनिराळ्या मार्गानी काळ्याचे पांढरे करणे, व्यापारातील काळा पैसा शेतकी व बिगर शेतकी जमिनीत गुंतवणे, कामगार कायद्यांमधून पळवाटा काढण्यासाठी रातोरात उद्योगाचे नाव व पत्ता बदलणे इत्यादी अनेकोनेक कल्पक उपद्व्याप हे हुशार लोक करीत असतात. यांना ‘सिस्टीम’ची भिती वाटत नसते व यांचा ‘अंतरात्मा’ महाबेरकी असतो (अथवा तो नसतोच). यातील बरेचजण आपल्या भागिदारांपासूनही बऱ्याच गोष्टी लपवतात. गमतीचा परंतु अविवेकी प्रकार म्हणजे यांच्यापैकी बरेचजण अंधश्रद्धा बाळगत किंवा वापरत असतात. इथेसुद्धा अर्थात व्यापारी दृष्टीकोन असतो. काहीजण तर अंधश्रद्धांचाच व्यापार करतात!

 

अगदीच पाताळयंत्री असलेले व्यापारी हे बऱ्याचदा ठरवून दिवाळखोर होतात. दिवाळखोरीबद्दल कोण काय म्हणेल याची फिकीर हे करत नाहीत. नियोजनबद्ध दिवाळखोरी करताना हे उद्योगातले आपले भांडवल नानाप्रकारे काढून घेतात. लोकांची कर्जे अथवा देणी हेतूपुरस्सरपणे बुडविताना यांची आस्तिकता (?) आड येत नाही. तरुण मराठी उद्योजकांनी सरळपणा बाजूला ठेऊन अशा लबाड व्यापाऱ्यांना चतुराईने हाताळले पाहिजे. पाचही पांडव महापराक्रमी व सज्जन होते परंतु शकुनीच्या फाशांमध्ये अडकत गेले. युधिष्ठीर किंवा हरिश्चंद्र बनून लबाडांचा मुकाबला करता येणार नाही. यासाठी पदोपदी “कृष्णनीती” वापरावी लागेल ! यासाठी जमल्यास माझा नवा ग्रंथ “कृष्ण कोण होता” हा जरुर वाचावा. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने त्याचे प्रकाशन केले आहे. ऑनलाइनही तुम्हाला ते मिळू शकेल.
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला !

 

girish jakhotiya

(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात. सध्या मुख्य सल्लागार, जाखोटिया आणि असोसिएट्स म्हणून कार्यरत आहेत.)

Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.


Tags: Dr. Girish JakhotiyaMarathi entrepreneursडॉ. गिरीश जाखोटिया
Previous Post

रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर: गिनीज बुककडून नोंद, पण मराठी साहित्यविश्वाचे दुर्लक्ष!

Next Post

अखेर आता प्रवीण दरेकरांची चौकशी! मुंबई बँकेप्रकरणी अडचणीत आणणारे हेच ते १० मुद्दे

Next Post
pravin darekar mumbai bank

अखेर आता प्रवीण दरेकरांची चौकशी! मुंबई बँकेप्रकरणी अडचणीत आणणारे हेच ते १० मुद्दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!