मुक्तपीठ टीम
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे तिकीट बुकिंग करणे सोपे होणार आहे. प्रवासी आता क्यूआर कोडद्वारे ट्रॅक तिकीट बुक करू शकतील.
‘या’ अॅपच्या मदतीने QR कोड स्कॅन करून मिळणार रेल्वे तिकीट!
- क्यूआर कोडद्वारे तिकीट बुक करण्यासाठी रेल्वेने अॅप लाँच केले आहे.
- ज्याचे नाव यूटीएस अॅप आहे.
- प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर हे अॅप इंस्टॉल करून तिकीट बुक करता येणार आहे.
दक्षिण रेल्वेच्या ६१ स्थानकांवर QR कोडद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा
- क्यूआर कोडद्वारे तिकीट बुक करणे सध्या, मंगळुरू सेंट्रल आणि मंगळुरू जंक्शनसह दक्षिण रेल्वेच्या इतर विभागातील ६१ स्थानकांना रेल्वे यूटीएस अॅपद्वारे क्यूआर कोडद्वारे अनारक्षित तिकिटे बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
- याशिवाय क्यूआर कोडवरून सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीटं रिन्यूही करता येते.
क्यू्आर कोडने तिकीट बुक करण्याच्या सोप्या स्टेप्स?
- भारतीय रेल्वेच्या या सुविधेअंतर्गत, वॉलेट, यूपीआय, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून अॅपवरून क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करावे लागेल.
- मशीनवर क्यूआर कोड फ्लॅश होताना दिसेल, त्यानंतर तो स्कॅन करावा लागेल.
- ते स्कॅन केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर, ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणचे तिकीट मिळेल.
- रेल्वेच्या वतीने डिजिटल पेमेंटच्या सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी क्यूआर कोडद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण रेल्वेच्या मार्गांवर खासगी एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या हॉल्ट स्टेशनसाठी ही सुविधा उपलब्ध होणार नाही.